आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sweeden Enters Semi Final Of UEFA Women Cup Football

यूईएफए महिला कप: चेलिनचे दोन गोल; स्वीडन प्रथमच अंतिम चारमध्ये

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हॉल्मास्टेड- स्वीडनच्या महिला संघाने प्रथमच यूईएफए युरो 2013 फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. या संघाने उपांत्यपूर्व लढतीत आइसलँडचा 4-0 ने पराभव केला. चेलिनने (19, 59 मि.) गोल करून संघाला एकतर्फी विजय मिळवून दिला. यासह स्वीडनच्या विजयात हाम्मास्ट्रोम (3 मि.) व ओक्विस्ट (14 मि.) यांनी प्रत्येकी एका गोलचे योगदान दिले.

हाम्मास्ट्रोमने केलेल्या सुरेख गोलच्या बळावर स्वीडनला लढतीत 1-0 ने आघाडी घेता आली. तिने सामन्याच्या तिसर्‍या मिनिटाला ही उल्लेखनीय कामगिरी केली. त्यानंतर अवघ्या अकरा मिनिटांत ओक्विस्टने संघाच्या आघाडीला 2-0 ने मजबूत केले. तिने 14 व्या मिनिटाला संघाकडून दुसरा फील्ड गोल केला. चेलिनने 19 व्या मिनिटाला वैयक्तिक पहिला आणि स्वीडनकडून तिसरा गोल केला. या गोलच्या बळावर स्वीडनने लढतीत मध्यंतरापूर्वी 3-0 ने आघाडी घेतली.
दुसर्‍या हाफमध्ये चेलिनने 59 व्या मिनिटाला मैदानी गोल केला. यासह स्वीडनने 4-0 ने एकतर्फी विजय निश्चित केला. दरम्यान, आइसलँडने गोलचे खाते उघडण्यासाठी केलेले प्रयत्न अपयशी ठरले.


यूईएफए महिला युरो 2013: सिमोनचा गोल; जर्मनी उपांत्य फेरीत
जर्मनी संघाने महिलांच्या यूईएफ फुटबॉल चॅम्पियनशिपच्या उपांत्य लढतीत प्रवेश केला. या संघाने मिडफील्डर सिमोन लाऊडेहरने केलेल्या गोलच्या बळावर इटलीवर 1-0 ने विजय मिळवला. तिने सामन्याच्या 26 व्या मिनिटाला गोल केला. हा सामन्यातील एकमेव गोल ठरला.