आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वप्निलचा सलग 34 तास पोहण्याचा नवा विक्रम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - एमजीएम महाविद्यालयाच्या जलतरणिकेवर रविवारी युवा जलतरणपटू स्वप्निल वडगावकरने सलग 34 तास 6 मिनिटे पोहण्याचा नवा विक्रम नोंदवला. त्याने शनिवारी या मोहिमेला सकाळी प्रारंभ केला होता. त्याने प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी रविवारी दुपारी विक्रमाची नोंद केली.

विक्रमी कामगिरी करणार्‍या स्वप्निलला पाहण्यासाठी जलतरणिकेवर चाहत्यांनी रविवारी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. यासह महाविद्यालयाचे पदाधिकारीही उपस्थित होते. वैद्यकीय तपासणीसाठी एमजीएमचे दोन डॉक्टरही कार्यरत होते. या विक्रमाबद्दल स्वप्निलचे अभिनंदन होत आहे.

स्वप्निलचा सत्कार
सलग 34 तास पोहण्याची विक्रमी कामगिरी करणार्‍या स्वप्निलचा जलतरणिकेवर सत्कार करण्यात आला. या वेळी एमजीएमचे अंकुश कदम, आशिष गाडेकर, कर्नल प्रदीपकुमार, शशिकांत वडगावकर, शरद वडगावकर आणि महाविद्यालयाचे शिक्षकवृंद उपस्थित होते.

‘ध्येयापुढची कामगिरी’
सलग 31 तास पोहण्याचे ध्येय निश्चित केले होते. या वेळी चाहत्यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे आत्मविश्वास द्विगुणित झाला आणि यातूनच ध्येयापुढची कामगिरी नोंदवता आली. - स्वप्निल वडगावकर