आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अलेक्झांडरचा गोल; स्वीडनची मासेडोनियावर मात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माल्मो- स्वीडनने आंतरराष्‍ट्रीय मैत्रीपूर्ण फुटबॉल सामन्यात मासेडोनियाचा 1-0 अशा फरकाने पराभव केला. या रोमांचक लढतीत अलेक्झांडर कासानिकिल्सने हेडर गोल करून संघाला विजय मिळवून दिला. एफवायआर मासेडोनियाने सामन्यात दमदार पुनरागमनचा प्रयत्न केला. मात्र, स्विडनच्या आक्रमक खेळीमुळे या टीमचा हा प्रयत्न अपयशी ठरला. यामुळे ही लढत 38 व्या मिनिटापर्यंत शून्य गोलने बरोबरीत खेळवली गेली. अखेर अलेक्झांडरने 39 व्या मिनिटाला सुरेख गोल केला. या गोलच्या बळावर स्वीडनला 1-0 ने आघाडी घेता आली.

बेलारूसचा शानदार विजय
दुसरीकडे बेलारूसने मैत्रीपूर्ण फुटबॉल सामन्यात इस्टोनियावर 2-0 ने मात केली. अ‍ॅटोन पुस्टिला व व्ही. रोडिनोव्हने गोल करून संघाला एकतर्फी विजय मिळवून दिला. सामन्याच्या 31 व्या मिनिटापर्यंत ही लढत 0-0 ने बरोबरीत खेळवली गेली. अखेर 32 व्या मिनिटाला अ‍ॅटोन पुस्टिलाने फिल्ड गोल करून बेलारूसला 1-0 ने आघाडी मिळवून दिली. या गोलच्या बळावर या टीमने सामन्यावर पकड घेतली. पिछाडीवर पडलेल्या इस्टोनियाने सामन्यात बरोबरी मिळवण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, प्रतिस्पर्धी टीमच्या गोलरक्षकाने हा प्रयत्न यशस्वी होऊ दिला नाही. त्यानंतर दुस-या हाफमध्ये व्ही. रोडिनोव्हने 80 व्या मिनिटाला गोल केला. यासह बेलारूसने सामन्यात एकतर्फी विजय निश्चित केला.