आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Swiss Open Gold Badminton News In Marathi, Sports

स्विस ग्रांप्री गोल्ड: कश्यप, आनंदची विजयी सुरुवात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बासेल- पारुपल्ली कश्यप आणि आनंद पवार यांनी स्विस ग्रांप्री गोल्ड बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सुरुवात केली. दोघांनी मंगळवारी रात्री उशिरा झालेल्या सामन्यांत विजय मिळवला. दुसरीकडे के. श्रीकांतला आपल्या पहिल्याच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला.

कश्यपने पहिल्या फेरीत हॉलंडच्या एरिक मेजिसला 21-17, 21-15 ने हरवले. हा सामना 34 मिनिटे चालला. दुसर्‍या फेरीत कश्यपचा सामना जर्मनीच्या लुकास श्मिड याच्याशी होईल. आनंदने मलेशियाच्या पोंग लोकला 26 मिनिटांत 21-17, 21-10 ने मात दिली. आता आनंदचा सामना जर्मनीच्या टोबियस वादेंकाशी होईल.

कोना-पोनप्पा बाहेर
तरुण कोना-अश्विनी पोनप्पा यांना मिश्र दुहेरीच्या पहिल्याच फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. त्यांना पोलंडचा रॉबर्ट मातियुसियाक व एग्निजस्का वोज्किोवस्का यांनी 21-10, 16-21, 21-13 ने हरवले. पुरूष एकेरीत स्वीडनच्या हेन्री हुर्सकाईनेन याने भारताच्या के. श्रीकांतला 21-19, 18-21, 17-21 ने हरवले.