आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Syad Modi International Badminton: Saina, Shrikant Has Time To Win

सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत सायना नेहवाल, श्रीकांतला विजेतेपदाची आज संधी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ - गतविजेती सायना नेहवाल सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या किताबापासून अवघ्या एका पावलावर आहे. तिला सत्राच्या सुरुवातीला या स्पर्धेत महिला एकेरीचे जेतेपद आपल्या नावे करण्याची संधी आहे. तिने शनिवारी महिला एकेरीची अंतिम फेरी गाठली. दुसरीकडे श्रीकांतने पुरुष गटाच्या फायनलमध्ये प्रवेश निश्चित केला. सायना नेहवालने उपांत्य सामन्यात चौथ्या मानांकित थायलंडच्या निचोन जिंदापोनचा पराभव केला. तिने २१-१०, २१-१६ अशा फरकाने विजय मिळवला. सायनाने अवघ्या ४० मिनिटांत या लढतीत बाजी मारली. पुरुष एकेरीच्या सेमीफायनलमध्ये आपला सहकारी मित्र एच. एस. प्रणवचा पराभव केला. अव्वल मानांकित श्रीकांतने १२-२१, २१-१२, २१-१४ ने सामना जिंकला.