Home | Sports | From The Field | sydney cricket groung is special for sachin tendulkar

सिडनीचे मैदान सचिनसाठी 'व्‍हेरी व्‍हेरी स्‍पेशल'

वृत्तसंस्‍था | Update - Jan 01, 2012, 10:59 AM IST

या मैदानावर त्‍याने खेळलेल्‍या चार कसोटींमध्ये सचिनने दोन शतके व एक द्विशतक केले आहे.

  • sydney cricket groung is special for sachin tendulkar

    सिडनीः ऑस्‍ट्रेलियातील सिडनी येथील क्रिकेटचे मैदान मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे भारताबाहेरील फेव्‍हरेट मैदान आहे. हे मैदान सचिनसाठी खास आहे. मास्टर-ब्लास्टरला सिडनी क्रिकेट ग्राऊंड (एससीजी) अधिक आवडते. सिडनीत त्याच्या बॅटमधून हमखास धावा निघतातच. त्‍याचा रेकॉर्ड या मैदानावर खूप स्‍पेशल आहे. त्‍यामुळे त्‍याच्‍या महाशतकासाठी आतुरलेल्‍या चाहत्‍यांची इच्‍छा सिडनीमध्‍ये पूर्ण होण्‍याची आशा आहे. या मैदानावर त्‍याने खेळलेल्‍या चार कसोटींमध्ये सचिनने दोन शतके व एक द्विशतक केले आहे. त्‍यामुळे या मैदानावर तो शतक ठोकेल, अशी आशा आहे.
    स्‍वतः सचिन सिडनीबाबत खूप उत्‍साही आहे. तो म्हणतो, 'भारताबाहेर सिडनी माझे फेव्हरिट मैदान आहे. माझ्यासाठी हे मैदान खास आहे. येथील वातावरण, प्रेक्षकांच्या टाळ्यांचा आवाज या सा-या गोष्टी मला खूप आवडतात. प्रत्येक खेळाडूच्या मनात काही मैदानांसाठी एक खास आणि जवळचे स्थान असते. मला एससीजीबाबत असेच वाटते. येथे खेळताना सुखावह वाटते... हमखास चांगली कामगिरी होणार याची खात्री असते...', असे सचिन सांगतो. सचिनने २२ वर्षांच्या कारकीर्दीत तब्बल ५९ मैदानांवर सामने खेळला आहे. यापैकी सिडनीचा अपवाद वगळता केवळ ढाका व मिरपूरला त्याची सरासरी जास्‍त आहे.

Trending