आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टी-20 क्रिकेट: भारतीय महिला संघाचा पराभव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विशाखापट्टणम - भारतीय महिला संघाने मंगळवारी श्रीलंकेविरुद्ध तीन टी-20 क्रिकेट सामन्यांची मालिका गमावली. पाहुण्या श्रीलंका टीमने मालिकेत 2-1 ने विजय मिळवला. तिस-या सामन्यात श्रीलंकेने भारतावर 6 गड्यांनी मात केली. प्रथम फलंदाजी करताना भारताने 8 बाद 117 धावा काढल्या होत्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेने 18.5 षटकांत 4 गडी गमावून लक्ष्य गाठले.
धावांचा पाठलाग करणा-या श्रीलंकेची निराशाजनक सुरुवात झाली. सलामीवीर जयाग्नी (10) व मेंडिस (1) स्वस्तात बाद झाल्या. रसागिंका (21), कुमारीहामीने (16) कर्णधार श्रीवर्धनेसोबत 45 धावांची भागीदारी केली.