आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टी-20 : महाराष्ट्राचा सलग दुसरा विजय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद- विजय झोल (57) आणि केदार जाधवच्या (57) शतकी भागीदारीच्या बळावर महाराष्ट्राने बडोद्यावर 7 धावांनी मात केली. महाराष्ट्राने पश्चिम विभाग सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी टी-20 स्पर्धेत सलग दुसरा विजय मिळवला.

प्रथम फलंदाजी करताना महाराष्ट्राने 20 षटकांत 4 बाद 178 धावा काढल्या. संघाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर हर्षद खडीवाले केवळ 3 धावा करून बाद झाला. त्यानंतर दुसर्‍या विकेटसाठी विजय झोल आणि केदार जाधवने 114 धावांची भागीदारी रचली. यात विजयने 40 चेंडूंचा सामना करताना 6 चौकार व 2 षटकार खेचत 57 धावा ठोकल्या. त्याला केतन पांचाळने झेलबाद केले. केदारने 28 चेंडूंत 6 चौकार आणि 3 षटकार लगावत 57 धावा चोपल्या. त्याचा अडथळा मुतरुझा व्होराने दूर केला. निखिल नाईकने 30 तर पराग भाटीने नाबाद 27 धावा केल्या. प्रत्युत्तरात बडोद्याचा संघ 19.5 षटकांत सर्वबाद 171 धावाच करू शकला. केदार देवधरने सर्वाधिक 60 आणि हार्दिक पांडेने 44 धावा केल्या. महाराष्ट्राच्या समद फल्लाहने 3 षटकांत 27 धावा देत 3 गडी बाद केले. शुभम रांजणेने 4 षटकांत 41 धावांच्या मोबदल्यात 3 गडी टिपले.
संक्षिप्त धावफलक
महाराष्ट्र - 20 षटकांत 4 बाद 178 धावा. विजय झोल 57, केदार जाधव 57, निखिल नाईक 30 धावा. केतन पांचाळ (1/20), भार्गव भट (1/21). बडोदा - 19.5 षटकांत सर्वबाद 171 धावा. केदार देवधर 60, हार्दिक पांडे 44 धावा. समद फल्लाह (3/27), शुभम रांजणे (3/41).