आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • T 20 WC News In Marathi, Sri Lanka, South Africa

T-20 WC: चित्तथरारक सामन्यात श्रीलंका 5 धावांनी विजयी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चितगाव (बांगलादेश)- पाचव्या टी-20 विश्व करंडकातील सुपर-10 च्या दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेने ठेवलेल्या 166 धावांच्या आव्हानाचा सामना करताना दक्षिण आफ्रिकेने धावांधार सुरवात केली होती. परंतु, त्यानंतर फलंदाजांना धावांमधील सातत्य राखता आले नाही. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला केवळ 160 धावांपर्यंत मजल मारता आली. श्रीलंकेने हा सामना पाच धावांनी जिंकला आहे.
श्रीलंकेने दक्षिण आफ्रिकेसमोर 166 धावांचे तगडे आव्हान ठेवले होते. श्रीलंकेकडून कुसल परेरा याने 40 चेंंडूत 6 चौकार आणि 3 षटकार लगावित सर्वाधिक 61 धावा केल्या होत्या.
श्रीलंकेला पहिला झटका दिलशान तिलकरत्नेच्या रुपाने बसला होता. दिलशान खाते उघडण्यापूर्वीच स्टेनच्या चेंडूवर बाद झाला होता. त्यानंतर जयवर्धने 9 धावा काढून तर संघकारा 14 धावा काढून बाद झाले होते. परेराने 40 चेंडुंचा सामना करीत 61 धावा केल्या. त्यानंतर कोणताही फलंदाज फार काळ खेळपट्टीवर टिकू शकला नाही. श्रीलंकेने 7 गडी गमावून 165 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज इम्रान ताहिरने 3 गडी बाद केले.
या सामन्यात श्रीलंकाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी झालेल्या पहिल्या सामन्यात भारताने पाकिस्तानला सात गडी राखून हरविले, आणि पहिला विजय नोंदविला.
दक्षिण आफ्रिकेचा संघ- फाक डू प्लॅसिस (कर्णधार), लोनवाबो सोत्सोबे, हाशिम आमला, फरहान बेहारदिन, क्विंटॉन डी कॉक (विकेटकीपर), एबी डिविलयर्स, जीन-पॉल डूमिनि, बेरून हेंडरिक्स, इमरान ताहिर, डेव्हिड मिलर, एल्बी मॉर्केल, मॉर्ने मॉर्केल, वायने पार्नेल, आरोन फेंगिसो, डेल स्टेन.
श्रीलंकेचा संघ : दिनेश चांडीमल (कर्णधार), लसिथ मलिंगा, चतुरंगा डीसिल्वा, दिलशान तिलकरत्ने, रंगना हेराथ, महेला जयवर्धने, नुवान कुलसेकरा, सुरंगा लकमल, एंजिलो मॅथ्यूज, अजंता मेंडिस, कुसल परेरा, थिसारा परेरा, सीकुगे प्रसन्ना, कुमार संगकारा (विकेटकीपर), सचित्रा सेनानायके, लाहिरु थिरिमने.
सामन्याची छायाचित्रे बघण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...