मीरपूर - श्रीलंकेचा प्रभारी कर्णधार लसिथ मलिंगा नशिबाचा धनी आहे. दिनेश निलंबित झाल्याने मलिंगाला प्रभारी कर्णधारपद सोपवण्यात आले होते. यापूर्वी तो संघाचा उपकर्णधार होता. प्रभारी कर्णधाराची भूमिका पार पाडत असलेला मलिंगा वर्ल्डकप विजेता कर्णधार बनला असून त्याने नवा इतिहास रचला. मलिंगाने हा विजय आपल्या संघाचे दोन महान खेळाडू महेला जयवर्धने आणि कुमार संगकारा यांना समर्पित केला. या दोघांनी या वर्ल्डकपनंतर आंतरराष्ट्रीय टी-20 मधून निवृत्तीची घोषणा केली आहे.
‘हा संगा आणि महेलाचा फेयरवेल सामना होता. या दोन्ही खेळाडूंसाठी आपणाला हा सामना जिंकायचा आहे, असे आम्ही सर्वांनी ठरवले होते. हे दोघेही जागतिक दर्जाचे फलंदाज आहेत. या दोघांसोबत खेळण्याची संधी मिळाली, हे आम्ही आमचे नशीब समजतो. हा विजय या दोघांच्या नावे आहे,’ असे मलिंगाने म्हटले.
श्रीलंकेला मिळणार 9 कोटी
टीम इंडियाला नमवून आयसीसीचा वर्ल्डकप जिंकणाºया श्रीलंकेला बोनस ( जवळपास 9 कोटी) 15 लाख डॉलरची भेट मिळाली. श्रीलंका क्रिकेट मंडळाने हे बक्षीस जाहीर केले. लंकेने उपांत्य सामन्यात गतविजेत्या वेस्ट इंडीजचा आणि नंतर फायनलमध्ये भारताचा पराभव केल्याने मंडळाकडून हे बक्षीस जाहीर करण्यात आले.