आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • T 20 World Cup 2014 : Mahendra Singh Dhoni Latest News In Marathi

टी-20 वर्ल्डकप पराभवानंतरही धोनी आयसीसी टी-20 संघाचा कर्णधार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मीरपूर - टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी बांगलादेशात झालेल्या वर्ल्डकप टी-20 क्रिकेट स्पर्धेत भारताला विजेतेपद मिळवून देऊ शकला नसला तरीही आयसीसीने त्याची नेतृत्व क्षमता सर्वश्रेष्ठ मानली आहे. आयसीसीने घोषित केलेल्या वर्ल्डकप टी-20 संघाचे कर्णधारपद धोनीकडे सोपवण्यात आले आहे. या संघात विराट कोहली, रोहित शर्मा, आर. अश्विन या भारतीय खेळाडूंचा समावेश आहे.
भारताशिवाय द. आफ्रिका आणि वेस्ट इंडीजच्या प्रत्येकी दोन खेळाडूंचा समावेश आहे. ऑस्ट्रेलिया, हॉलंड आणि विश्वविजेता श्रीलंकेच्या प्रत्येकी एका खेळाडूला संघात स्थान मिळाले. पाकिस्तानच्या एकाही खेळाडूला वर्ल्ड संघात जागा मिळाली नाही. तज्ज्ञांच्या एका गटाने स्पर्धेतील खेळाडूंच्या कामगिरीच्या आधारे ही निवड केली आहे. टीम सिलेक्शन पॅनलचे अध्यक्ष आणि आयसीसीचे सामनाधिकारी एमिरेट्स पॅनलचे सदस्य डेव्हिड बून यांनी याबाबत माहिती दिली.
‘या स्पर्धेत खेळणा-या खेळाडूंतून अकरा खेळाडूंची निवड करणे पॅनलसाठी कठीण काम होते. मात्र, आम्ही कामगिरीच्या आधारे ही निवड केली आहे.’
एकट्यालाच जबाबदार धरणे चुकीचे
चंदिगड २ अंतिम सामन्यात युवराजला तडाखेबंद फलंदाजी करता आली नाही म्हणून त्याला एकट्याला पराभवास कारणीभूत मानू नये. क्रिकेट हा सांघिक खेळ असल्याने त्याला एकट्याला अपयशाचे धनी करणे योग्य नसल्याचे मत युवराजचे वडील योगराजसिंह यांनी व्यक्त केले.
युवराजला इतकी दूषणे लावू नका : हरभजन
नवी दिल्ली २ युवराजसाठी तो एक दिवस खराब होता, म्हणून त्याच्यावर टीकेची झोड उठवण्याची गरज नाही, अशा शब्दांत हरभजनसिंग याने युवीचा बचाव केला आहे. बहुतांश महत्त्वाच्या सामन्यात युवीने संघासाठी मोठ्या खेळी केल्या आहेत. अशा खेळाडूच्या आयुष्यात एक दिवस वाईट आला म्हणून इतके कटू वागणार आहोत का, असा सवालदेखील भज्जीने केला.