आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • T 20 World Cup 2014 Netherlands Vs Sri Lanka Match Result Latest News In Marathi

कमी धावसंख्‍येवर सर्वबाद होण्‍यात नेदरलँडच नाही तर भारत आणि पा‍कचाही होतो समावेश!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे असे म्‍हटले जाते. याचा प्रत्‍यय टी-20 विश्‍व चषकात नुकताच आला आहे. श्रीलंका आणि नेदरलॅंड दरम्‍यान खेळल्‍या गेलेल्‍या सामन्‍यामध्‍ये श्रीलंकेने आपल्‍या घातक गोलंदाजीने नेदरलँड संघाला 10.3 षटकात 39 धावसंख्‍येवरच गुंडाळले. तर पाच षटकातच 40 धावा करुन श्रीलंकेने नेदरलॅडवर विजय मिळविला. टी-20 प्रकारातील ही सर्वांत कमी धावसंख्‍या होती. यापुर्वी केनिया संघ 56 धावसंख्‍येवर सर्वबाद झाला होता.
यापूर्वी भारत आणि पाकिस्‍तानही 74 धावसंख्‍येवर सर्वबाद झाले होते.

श्रीलंकेच्‍या घातक गोलंदाजांसमोर पाच फलंदाजांना खातेही उघडता आले नाही. त्‍यामध्‍ये माईबुर्घ, स्वार्ट, कर्णधार बोरेन, गुटेन आणि जमील यांचा समावेश आहे. तर मागील सामन्‍यामध्‍ये नेदरलँड संघाने आयरलँड संघाविरुध्‍द 19 षटकार खेचून विश्‍वविक्रम केला होता.

श्रीलंकेच्‍या मॅथ्‍यूज आणि मेंडिस यांनी प्रत्‍येकी तीन-तीन विकेट मिळविल्‍या. मलिंगाने दोन तर कुलशेखराने एक विकेट पटकाविली.

पुढील स्‍लाइडवर क्लि करा आणि वाचा, कमी धावसंख्‍येवर सर्वबाद होणारे संघ..