आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टी-20 करंडकाचे अनावरण : भारत पुन्हा वर्ल्ड कप जिंकणार-सेहवाग

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंदूर- आयसीसी टी-20 वर्ल्ड कपचे अनावरण बुधवारी येथे एका भव्य कार्यक्रमात टीम इंडियाचा सलामीवीर वीरेंद्र सेहवागच्या हस्ते करण्यात आले. टीम इंडिया पुन्हा एकदा टी-20 वर्ल्ड कप जिंकण्यात यशस्वी ठरेल. चाहत्यांनी संघाला जोरदार समर्थन द्यावे, असे आवाहन या वेळी त्याने केले.
‘सप्टेंबर-आॅक्टोबरमध्ये श्रीलंकेत होणाºया टी-20 चॅम्पियनशिपची आम्हाला आतुरतेने प्रतीक्षा आहे. मागच्या वनडे वर्ल्ड कपच्या वेळी तुम्ही सर्वांनी आम्हाला जोरदार समर्थन दिले होते आणि आम्ही विजेतेपद मिळवण्यात यशस्वी ठरलो होतो. या वेळीसुद्धा आम्ही पुन्हा यात यशस्वी होऊ अशी आशा आहे,’ असे वीरूने म्हटले. हॉटेल रेडिसन येथे आयोजित कार्यक्रमात रिलायन्सच्या अधिकाºयांनी सेहवागला विशेष बॅट भेट दिली.
होळकर स्टेडियमवर वीरू - सेहवागने होळकर स्टेडिमयवरसुद्धा टी-20 वर्ल्ड कप करंडकाच्या अनावरण कार्यक्रमात सहभाग घेतला. या वेळी वीरू म्हणाला, ‘मी स्वत: इंदुरात येण्यासाठी आतुर होतो. आयसीसीने माझ्यासमोर हा प्रस्ताव ठेवताच मी पटकन तयार झालो.’ मागच्या वर्षी 8 डिसेंबर रोजी सेहवागने होळकर स्टेडियमवर वेस्ट इंडीजविरुद्ध 219 धावांची विक्रमी खेळी केली होती. मला स्वत:ला येथे यायचे होते. या मैदानावर मी विक्रमी खेळी केली आहे. येथे माझे मित्र हिरूभाई (नरेंद्र हिरवाणी, निवड समिती सदस्य) आणि अमेय (माजी क्रिकेटपटू) सध्या उपस्थित आहेत. भारताने या वर्षी श्रीलंकेत पुन्हा विजय मिळवावा असे मला मनापासून वाटते, असेही त्याने म्हटले. या वेळी बीसीसीआयचे सचिव संजय जगदाळेही उपस्थित होते.
एमपीसीएकडे दुर्लक्ष- हॉटेल रेडिसन येथे आयोजित कार्यक्रमात आयोजकांकडून खेळभावनेची थट्टा करण्यात आली. कार्यक्रमात निमंत्रित सदस्यांत मध्य प्रदेश क्रिकेट संघटनेचे पदाधिकारीसुद्धा होते. मात्र मंचावर एकालाही बोलावण्यात आले नाही. या अवमानामुळे नाराज झालेले एमपीसीएचे सचिव नरेंद्र मेनन, चेअरमन डॉ. एम. के. भार्गव नाराज होऊन निघून गेले.
मीडियापासून ठेवले अंतर- दिवसभराच्या कार्यक्रमात सेहवागने मीडियापासून अंतर ठेवले. मीडियाशी कोणत्याही विषयावर बोलण्यास त्याने स्पष्टपणे नकार दिला. काही दिवसांपूर्वी धोनीविरुद्ध केलेल्या टीकेमुळे तो चर्चेत आला होता. इंदुरात आयोजित कार्यक्रमात संक्षिप्त मत व्यक्त करण्याशिवाय त्याने मीडियाच्या एकाही प्रश्नाचे उत्तर दिले नाही.