आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • T 20 World Cup News In Marathi, Australia Versus New Zealand Match

ऑस्ट्रेलियन महिलांसमोर आज न्यूझीलंडचे आव्हान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिलहट - महिलांच्या आयसीसी टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या मुख्य फेरीला रविवारपासून सुरुवात होत आहे. यात ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात सलामीचा सामना रंगणार आहे. नुकत्याच झालेल्या सराव सामन्यात ऑस्ट्रेलियाने धडाकेबाज विजयाची नोंद केली. त्यामुळे ही विजयाची लय कायम ठेवण्याचा ऑस्ट्रेलियाचा प्रयत्न असेल. दुसरीकडे न्यूझीलंड संघही विजयासाठी सज्ज झाला आहे. तसेच दुसरा सामना पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणार आहे.

मिताली राजच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघ सोमवारी श्रीलंकेच्या आव्हानाला सामोरा जाणार आहे. भारतीय संघाची पूनम राऊत, सोनिया डबीर आणि शिखा पांडे सध्या जबरदस्त फॉर्मात आहेत. या तिघींनीही सराव सामन्यात उल्लेखनीय कामगिरी केली आहे.