आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • T 20 World Cup News In Marathi, India Verses England, Divya Marathi

टी-20 विश्‍वचषक: भारतीय संघाची इंग्लं‍डविरूध्‍द आज लढत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मीरपूर - टी-20 वर्ल्डकपसाठी टीम इंडिया अजून सज्ज झालेली नाही. पहिल्या सराव सामन्यात श्रीलंकेविरुद्ध भारताचा 5 धावांनी पराभव झाला. लंकेविरुद्ध पराभव झाला, तरीही युवराज आणि रैनाच्या बॅटीतून धावा निघाल्याने कर्णधार धोनी समाधानी असेल. आता बुधवारी इंग्लंडविरुद्ध टीम इंडियाचा सराव सामना असून यात विजयी ट्रॅकवर परतण्याचे लक्ष्य धोनी ब्रिगेडचे असेल. हा सामना सायंकाळी 7 वाजता खेळवला जाईल. वर्ल्डकपमध्ये भारताचा पहिला सामना 21 मार्च रोजी पाकिस्तानसोबत आहे.


गोलंदाज यशस्वी, फलंदाज अपयशी :
टीम इंडियाच्या दावेदारीचा विषय निघाला की, गोलंदाजी आपली दुबळी बाजू असल्याचे बोलले जाते. मात्र, सोमवारी लंकेविरुद्ध गोलंदाजांनी दमदार प्रदर्शन केले. भारतीय गोलंदाजांनी लंकेला 6 बाद 153 धावांवर रोखले. यानंतर फलंदाजांची कसोटी होती. मात्र, फलंदाज अपेक्षेनुसार कामगिरी करू शकले नाहीत. टीम इंडियाचा डाव 148 धावांत आटोपला. सुरेश रैनाने 31 चेंडूंत 41 धावा काढल्या. युवीने 33 धावांची खेळी केली. अश्विनने 19 धावा काढल्या. मात्र, विजयासाठी भारताचे प्रयत्न अपुरे ठरले.


शिखर, रोहितवर दबाव
फलंदाजी हे नेहमीच टीम इंडियाचे शक्तिस्थान राहिले आहे. मात्र, गेले काही दिवस टीम इंडियाचे फलंदाज सातत्यपूर्ण कामगिरी करण्यात अपयशी ठरले आहेत. इंग्लंडविरुद्ध सामन्यात सलामीवीर शिखर धवन आणि रोहित शर्मा यांच्यावर चांगल्या कामगिरीचा दबाव असेल.


दोन्ही संभाव्य संघ
भारतीय संघ : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, सुरेश रैना, युवराजसिंग, विराट कोहली, रवींद्र जडेजा, अजिंक्य रहाणे, स्टुअर्ट बिन्नी, आर. अश्विन, अमित मिश्रा, भुवनेश्वर कुमार, वरुण अ‍ॅरोन, मो. शमी, मनीष शर्मा.


इंग्लंड संघ : स्टुअर्ट ब्रॉड (कर्णधार), इयान मोर्गन, मोईन अली, इयान बेल, रवी बोपारा, टीम ब्रेसनन, जोस बटलर, डर्नबॅच, अ‍ॅलेक्स हाल्स, क्रिस जॉर्डन, मायकेल लम्ब, स्टिफन पेरी, जेम्स ट्रेडवेल, क्रिस वोग्स, ल्युक राइट, जो. रुट, बेन स्ट्रोक्स.