आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • T 20 World Cup News In Marathi, India Versus England Match, Divya Marathi

टी-20 विश्‍वचषक: टीम इंडिया विजयी ट्रॅकवर परतली, इंग्लंडचा 20 धावांनी पराभव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मीरपूर - अखेर टीम इंडिया विजयी ट्रॅकवर परतली आहे. द. आफ्रिका, न्यूझीलंड दौ-यापासून ते आशिया चषकापर्यंत सलग पराभवाचा सामना करणा-या भारताला वर्ल्डकप टी-20 मधील पहिल्या सराव सामन्यातही लंकेकडून हार स्वीकारावी लागली होती. मात्र, बुधवारी दुस-या सराव सामन्यात धोनी ब्रिगेडने इंग्लंडवर 20 धावांनी विजय मिळवला. विराट कोहली (74) आणि सुरेश रैना (54) भारताच्या विजयाचे शिल्पकार ठरले. आता वर्ल्डकपमध्ये भारताचा पहिला सामना शुक्रवारी पाकिस्तानसोबत होईल.


भारताने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकांत 4 बाद 178 धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युत्तरात इंग्लंडला 6 बाद 158 धावाच काढता आल्या. भारताकडून कोहलीने 48 चेंडूंचा सामना करताना 8 चौकारांच्या मदतीने ही जिगरबाज खेळी केली. दुसरीकडे सुरेश रैनाने फॉर्म परत मिळवताना अवघ्या 31 चेंडूंत 6 चौकार आणि 2 षटकाराच्या साह्याने 54 धावा काढल्या.


रोहित, धवन पुन्हा अपयशी
भारताची सुरुवात चांगली झाली नाही. दोन्ही सलामीवीर अवघ्या 30 धावांत तंबूत परतले. रोहित शर्मा 5, तर शिखर धवन 14 धावा काढून बाद झाला. गेल्या कित्येक सामन्यांपासून दोन्ही सलामीवीरांचे अपयश भारताला अडचणीचे ठरत आहे. रोहित बाद झाल्यानंतर चौथ्या षटकात खेळपट्टीवर आलेल्या कोहलीने अखेरपर्र्यंत नाबाद खेळी करीत भारताला सन्मानजनक स्कोअर उभा करून दिला. चौथ्या क्रमांकावर आलेल्या युवराजला मोठ खेळी करता आली नाही. युवी अवघ्या एका धावेवर बाद झाला. यानंतर कोहली-रैना यांनी 79 धावांची भागीदारी केली. अखेरीस कर्णधार धोनीने 14 चेंडूंत 1 षटकार आणि एक चौकारासह नाबाद 21 धावांचे योगदान दिले.


विराट दणका
74 धावा
48 चेंडू
08 चौकार
00 षटकार
रैना बरसे
54 धावा
31 चेंडू
06 चौकार
02 षटकार


गोलंदाजही चमकले
भारतीय गोलंदाजांनी या सामन्यात चांगली कामगिरी केली. त्यांनी इंग्लंडच्या फलंदाजांना मनसोक्त धावा काढू दिल्या नाहीत. इंग्लंडकडून एम. अली (46), मायकेल लम्ब (36) आणि जोस बटलर (30) यांनी संघर्ष केला. इतरांनी निराशा केली. इंग्लंडकडून एकालाही अर्धशतक काढता आले नाही. भारताकडून भुवनेश्वर, मो. शमी, आर. अश्विन, रैनाने प्रत्येकी एक गडी बाद केला. जडेजाने दोघांना बाद केले.


धावफलक
भारत धावा चेंडू 4 6
रोहित झे. हाल्से गो. डर्नबॅच 05 08 0 0
धवन झे. ट्रेडवेल गो. ब्रेसनन 14 15 2 0
विराट कोहली नाबाद 74 47 8 0
युवराज झे. बटलर गो. जॉर्डन 01 05 0 0
सुरेश रैना झे. जॉर्डन गो. बोपरा 54 31 6 2
महेंद्रसिंग धोनी नाबाद 21 14 1 1
अवांतर : 9. एकूण : 20 षटकांत 4 बाद 178 धावा. गडी बाद होण्याचा क्रम : 1-15, 2-30, 3-39, 4-120. गोलंदाजी : अली 1-0-4-0, डर्नबॅच 3-0-27-1, ब्रेसनन 3-0-31-1, जॉर्डन 4-0-37-1, बोपरा 2-0-25-1, स्टुअर्ट ब्रॉड 2-0-14-0, ट्रेडवेल 4-0-20-0, पेरी 1-0-17-0.
इंग्लंड धावा चेंडू 4 6
लम्ब यष्टिचीत धोनी गो. रैना 36 25 6 1
हाल्से त्रि. गो. भुवनेश्वर 16 14 3 0
एम. अली झे. रहाणे गो. जडेजा 46 38 4 1 मोर्गन झे. युवराज गो. अश्विन 16 16 1 0
बटलर यष्टिचीत धोनी गो. जडेजा 30 18 2 2
बोपरा त्रि. गो. शमी 06 04 1 0
टीम ब्रेसनन नाबाद 03 05 0 0
बी. जॉर्डन नाबाद 01 01 0 0
अवांतर : 4. एकूण : 20 षटकांत 6 बाद 158 धावा. गडी बाद होण्याचा क्रम : 1-43, 2-58, 3-87, 4-128, 5-145, 6-157. गोलंदाजी : भुवनेश्वर 3-0-27-1, मो. शमी 3-0-29-1, आर. अश्विन 4-0-20-1, रैना 4-0-23-1, जडेजा 3-0-23-2, मिश्रा 2-0-21-0, अ‍ॅरोन 1-0-13-0.