आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • T 20 World Cup News In Marathi, M.S.Satish, Divya Marathi

टी - 20 विश्वचषक: टीम व्यवस्थापक सतीशला धाडले माघारी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मिरपूर - टी - 20 विश्वचषकासाठी बांगलादेशात आलेल्या भारतीय संघाचे रसद व्यवस्थापक एम. ए. सतीश यांना पुन्हा मायदेशी पाठविण्यात आले आहे. इंडीया सिमेंट कंपनीच्या कर्मचार्‍यांना संघव्यवस्थापनाच्या सहायक कर्मचार्‍यांमध्ये नोकरी देण्यात आल्याच्या आरोपाच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे.
भारतीय संघाचे मुख्य व्यवस्थापक डॉ. आर. एन. बाबा यांनी त्याबाबतचा मेल बीसीसीआयकडे पाठवला आहे. प्रशिक्षण सत्राप्रसंगी सतीश अनुपस्थित होता, त्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आल्याची शक्यता आहे. बाबा यांनी पाठवलेल्या मेलमध्ये कोणतेही कारण देण्यात आलेले नाही. मात्र, सतीश हा इंडीया सिमेंटचा कर्मचारी असल्याने त्याच्यावर काही काळापासून नजर ठेवण्यात येत होती.


सतीशला पर्यायी व्यवस्था लवकरच : सतीशच्या जागी आता पर्यायी व्यवस्था करण्यात येत आहे. मात्र विसासारख्या बाबींना विलंब लागत असल्याचे त्यांनी या वेळी नमूद केले आहे.


भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह
भारतीय संघाचे रसद व्यवस्थापक सतीश यांच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. सतीश हा रसेल राधाकृष्णनला पर्याय म्हणून संघात आला होता. रसेलदेखील गतवर्षापर्यंत चेन्नईचा माध्यम व्यवस्थापक म्हणून कार्यरत होता. अन्य कर्मचार्‍यांना बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला असला तरी इंडीया सिमेंटचे धोनी आणि अश्वीन हे दोन कर्मचारी अद्याप भारतीय संघात आहे.