आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Table Tennis Player Anchata Sharth Medal In Glasgow Commonwealth Games

अंचता शरथ-अमलराजला रौप्यपदक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्लासगो - अंचता शरथ कमल आणि अ‍ॅन्थोनी अमलराज अमलराजने 20 व्या राष्ट्रकुल स्पर्धेतील टेबल टेनिसमध्ये भारताला रौप्यपदक मिळवून दिले. या जोडीला पुरुष दुहेरीच्या अंतिम लढतीत पराभवाला सामोरे जावे लागले. सिंगापूरच्या गाओ निंग आणि ली हुने दुहेरीच्या किताबावर नाव कोरले. या जोडीने अंचता-अमलराजला 3-1 ने पराभूत केले.

सुवर्णपदकापासून एका पावलावर असलेल्या भारताच्या जोडीने दमदार सुरुवात केली. त्यामुळे या जोडीला पहिल्या गेममध्ये 11-8 ने बाजी मारून लढतीत आघाडी मिळवता आली. मात्र, त्यानंतर सिंगापूरच्या जोडीने दमदार पुनरागमन करताना दुसरा गेम 11-7 ने जिंकून लढतीत बरोबरी साधली. त्यापाठोपाठ या जोडीने तिसºया गेममध्ये 11-9 ने बाजी मारून आघाडी मिळवली. विजयाची ही लय कायम ठेवत सिंगापूरच्या जोडीने चौथ्या गेममध्ये 11-5 ने विजय मिळवला. यासह गाओ-लीने सुवर्णपदक आपल्या नावे केले. पराभवामुळे भारताच्या जोडीला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

एकेरीत शरथ कमलचा पराभव
पुरुष एकेरीच्या टेबल टेनिसमध्ये अंचता शरथ कमलला पराभवा सामना करावा लागला. त्याला उपांत्य लढतीत इंग्लंडच्या लियाम पिचफोर्डने सहा गेमपर्यंत झालेल्या लढतीत 4-2 ने पराभूत करत कांस्यपदक पटकावले. शरथला दुहेरी पदक जिंकण्याची संधी होती. मात्र तो एकेरीत अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकला नाही.