आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Taken Five Wicket Is Very Special For Me Says Ravindra Jadeja

पाच विकेटची कामगिरी माझ्यासाठी खास: रवींद्र जडेजा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- चॅम्पियन्स ट्रॉफीत वेस्ट इंडीजविरुद्ध गोलंदाजी करताना पाच विकेट घेतल्या. हा क्षण खास असल्याची प्रतिक्रिया टीम इंडियाचा युवा अष्टपैलू खेळाडू आणि डावखुरा फिरकीपटू रवींद्र जडेजाने व्यक्त केली.

मी माझ्या बेसिक्सवर लक्ष दिले. ही माझी आतापर्यंतची सर्वोत्तम गोलंदाजी ठरली आहे. या कामगिरीमुळे मी खूप आनंदी आहे. मी यापूर्वी तीन किंवा चार बळी घेतले होते. मात्र, यंदा पाच विकेट घेतल्या. ही कामगिरी खासच ठरली. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करण्याचे मी ठरवले होते. मी तसेच केले आणि यशस्वी ठरलो, असेही त्याने नमूद केले. या वेळी त्याने धोनीचीही स्तुती केली.