आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Taking Wicket Of Sachin And Pointing Like Double Hattrick Says Ajit Chandila

IPL: सचिन, पाँटिंगच्या विकेटचा आनंद डबल हॅट्ट्रिकसारखा : चांदिला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयपूर- मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि रिकी पाँटिंग यांच्या विकेट घेण्याचा आनंद डबल हॅट्ट्रिक मिळवण्याइतका मोठा आहे, अशी प्रतिक्रिया राजस्थान रॉयल्सचा युवा ऑफस्पिनर अजित चांदिला याने व्यक्त केली. राजस्थान रॉयल्स-मुंबई इंडियन्स सामन्यात चांदिलाने सचिन आणि पाँटिंग यांना स्वस्तात बाद करून संघाला जबरदस्त सुरुवात करून दिली होती. ‘मागच्या वर्षी मी हॅट्ट्रिक घेतली होती. त्या हॅट्ट्रिकपेक्षाही या दोन विकेट मला अधिक महत्वाच्या वाटतात. माझे स्वप्न पूर्ण झाल्यासारखेच आहे. दोन दिग्गजांच्या, लिजेंडच्या विकेट घेणे म्हणजे माझ्यासाठी ही डबल हॅट्ट्रिकच आहे. कालच्या माझ्या कामगिरीवर माझा स्वत:चा अद्याप विश्वास बसलेला नाही. मी स्वप्न तर बघत नाही ना, असे वाटत आहे.

माझ्या भावना मी शब्दांत सांगू शकत नाही. मात्र, एका गोलंदाजासाठी हे यश खूप मोठे आहे,’ असे चांदिलाने म्हटले. राजस्थान रॉयल्सने 179 धावांचा डोंगर उभा केल्यानंतर मुंबई इंडियन्सचा डाव अवघ्या 18.2 षटकांत अवघ्या 92 धावांत आटोपला. राजस्थानने 87 धावांनी मोठा विजय मिळवला. मुंबईची सुरुवात अत्यंत वाईट झाली. सचिन पहिल्याच षटकात बाद झाला. यानंतर तिस-या षटकात पाँटिंगही चालता झाला.

हिरवाणीला श्रेय
चांदिलाने आपल्या यशाचे श्रेय माजी फिरकीपटू नरेंद्र हिरवाणी यांना दिले. ‘या सामन्यापूर्वी मला नरेंद्र हिरवाणी यांनी टिप्स दिल्या होत्या. त्यांनी मला अचूक टप्प्यावर गोलंदाजी करण्यास सांगितले. मी मोठ्या खेळाडूंना गोलंदाजी करणार होतो. यामुळे आत्मविश्वास खचू देऊ नकोस, असा सल्लाही त्यांनी मला दिला होता.