आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चेंडूशी छेडछाड करण्याचा प्रकार अनेक दशकांपासून कायम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मागच्या आठवड्यात दोन देशांचे कर्णधार चर्चेत होते. द. आफ्रिकेचा प्रभारी कर्णधार फॉप डुप्लेसिस आणि भारताचा कर्णधार विराट कोहली. दोघांवर चेंडूशी छेडछाड केल्याचा आरोप झाला. डुप्लेसिसवर आयसीसीने सामनानिधीतून १०० टक्के रक्कम कपातीचा दंंड ठोकला. मात्र, कोहलीविरुद्ध इंग्लंड संघाने सामनाधिकारी रंजन मदुगलेंकडे कोणतीच तक्रार
केली नाही. यामुळे त्याच्यावर कोणतीच कारवाई झाली नाही. आयसीसीचा स्वत:चा दृष्टिकोन आहे. मात्र, कानपूर कसोटीत कोहली तोंडातील च्युइंगम किंवा लॉजेंस खाल्ल्यानंतर त्याच्याशी चेंडू घासत असल्याचे आढळला होता. विराट कोणत्या वस्तूने चेंडूला घासत आहे, हे फुटेजमध्ये स्पष्ट होत नसल्याचे म्हणत आयसीसीने हे आरोप फेटाळले होते. मात्र, डुप्लेसिसच्या प्रकरणी तो एखाद्या वस्तूने चेंडूला घासत आहे, हे स्पष्टपणे दिसले. त्याच्यावर एका सामन्याच्या
बंदीची शिक्षा अपेक्षित होती. मात्र, १०० टक्के निधी कपातीचा दंड लागला. क्रिकेटमधील ४२.३ या नियमानुसार चेंडूची चमक कायम ठेवण्यासाठी घामाने किंवा आपल्या ड्रेसला चेंडू घासण्यास परवानगी आहे. मात्र, एखाद्या कृत्रिम वस्तूने चेंडूला घासण्याची परवानगी नाही. हे झाले चेंडूची चमक कायम ठेवण्याबाबत. मात्र, चेंडूची चमक कमी करण्यासाठी
फिरकीपटूंच्या करामतीही कमी नाहीत. ते चेंडूला बॅटीने अधिकाधिक मैदानावर पडू देतात. अशाने चेंडूची चमक कमी होते आणि चेंडू फिरकीला अधिक अनुकूल होतो. १९७० ते १९९० च्या दशकात भारतीय फिरकीपटू असे करायचे. नंतर कौंटी क्रिकेटमध्ये बाटलीच्या झाकणाने चेंडू कुरतडण्याची घटना घडल्या. पुढे इम्रान खानसारखा दिग्गज खेळाडू रिव्हर्स स्विंगसाठी चेंडूला कुरतडत असल्याचे लक्षात आलेे. चेंडूला कुरतडण्यासाठी नखाचा वापर होत होता. पाकचा शाहिद आफ्रिदीसुद्धा एकदा नखाने चेंडू कुतरडत असताना आढळला होता. १९७६ च्या भारत-इंग्लंड मालिकेत पाहुण्यांचा वेगवान गोलंदाज जॉन लिव्हरने वॅसलिनचा उपयोग केला. त्याच्या डोक्यावर जी पट्टी लावण्यात आली होती, त्यात वॅसलिन होते. पंच रुबेनने जॉन लिव्हरला पकडले. कर्णधार माइक डेनिससह संपूर्ण इंग्लंडने गोंधळ घालून सिद्ध करण्याचा प्रयत्न केला
लिव्हरने वॅसलिनचा उपयोग केला नाही. मात्र, रुबेन आपल्या निर्णयावर ठाम होते. रुबेन यांनी मुंबई पोलिस खात्यात फॉरेन्सिक विभागात फिंगर एक्स्पर्ट म्हणून काम केले आहे, हे इंग्लंडच्या खेळाडूंना नंतर कळले. रुबेन यांच्या हातून कसा चोर वाचू शकला असता? यामुळे लिव्हरच्या स्पष्टीकरणाला नाकारण्यात आले. पुढे वेगवान गोलंदाजांकडून खिशात
माती, चिखल, वॉर्निस आदी वस्तू घेऊन जाण्याचे प्रकार घडले. अनेकदा खोबऱ्याच्या तेलानेसुद्धा चमक कायम ठेवण्याचे प्रयत्न झाले. चेंडूशी छेडछाड करण्याचे प्रकार अजूनही सुरू आहेत, हे खेदाने म्हणावे लागते. गोलंदाजांचा स्वत:वरचा विश्वास कमी झाला असावा म्हणूनच ते चेंडूशी छेडछाड करतात. नजीकच्या भविष्यातही असे प्रकार दिसू शकतील. कारण गोलंदाजांच्या अशा कुरापतींना लगाम बसेल, असा नियम आयसीसीने अद्याप संशोधन केलेला नाही.
अयाज मेमन
ayazmamon80@gmail.com
बातम्या आणखी आहेत...