आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद- भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई) येथे सुरू असलेल्या चौथ्या राष्ट्रीय रँकिंग तिरंदाजी स्पर्धेत ऑलिम्पिकपटू तरुणदीप रॉय (1319 गुण) आणि एल. बोम्बल्यादेवीने (1324 गुण) आपणच देशातील उत्कृष्ट तिरंदाज असल्याचे सिद्ध
केले आहे. त्यांनी रिकर्व्ह प्रकारात ही कामगिरी केली. कंपाउंड प्रकारात रजत चौहान (689 गुण) आणि व्ही. ज्योती सुरेखाने (653 गुण) पहिले स्थान पटकावले.
दीपिकाच्या कामगिरीवर सर्वांची नजर होती. तिने निराशा केली. तिला चार प्रकारांत एकूण 1315 गुण घेत भारतीय क्रमवारीत दुस-या स्थानावर समाधान मानावे लागले. नुकताच अर्जुन पुरस्कार पटकावणारी चेकव्होलू स्वुरो 1308 गुण घेत तिस-या स्थानी विराजमान झाली. तीन वेळची ऑलिम्पिकपटू डोला बॅनर्जी 1249 गुणांसह सहाव्या स्थानावर राहिली. मुलांच्या गटात गेल्या दोन वर्ल्डकपला मुकलेल्या राहुल बॅनर्जीने शानदार पुनरागमन केले आहे. त्याने 1311 गुण घेत दुसरे स्थान पटकावले. याप्रसंगी साईचे सहायक संचालक वीरेंद्र भंडारकर, फेडरेशनचे एच. एल. जिंदल, सहसचिव प्रमोद चांदूरकर, सचिन मुळे, सी. आर. कुर्मी आदी परिश्रम घेत आहेत.
क्रमवारीतील अव्वल पाच खेळाडू
रिकर्व्ह गट
नाव गुण
तरुणदीप रॉय 1319
राहुल बॅनर्जी 1311
कपिल 1298
जयंत तालुकदार 1297
मंगलसिंग चॅम्पिया 1294
महिला गट
एल. बोम्बल्यादेवी 1324
दीपिकाकुमारी 1315
चेक्रव्होलू स्वुरो 1308
रिमिली बुरिली 1285
सतबीर कौर 1265
कंपाउंड गट
नाव गुण
रजत चौहान 689
संदीपकुमार 684
अभिषेक वर्मा 682
केवलप्रतीसिंग 680
रतनसिंग 678
महिला गट
व्ही. ज्योती सुरेखा 653
त्रिशा देब 651
पी. लीला चानू 648
जे. हंसाद 644
मंजुदा सॉय 643
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.