आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Teachers Day Special Indian Womens Boxing Coach Hemlata Singh Bagdwal

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिक्षक दिन : क्रीडाजगतातील ग्‍लॅमरस कोच, जिने केले अ‍ॅथलेटिक्‍सला हिट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो - भारतीय महिला बॉक्सिंग संघाची प्रशिक्षक हेमलता सिंह)
मेरी कॉम, पिंकी जांगडा आणि एल सरिता देवी यांनी बॉक्सिंगमध्‍ये भारताचे नाव जगात पोहोचवले. परंतु या सर्वांना मार्गदर्शन केले ते प्रशिक्षक हेमलता सिंह यांनी. हेमलतामुळेच या खेळाडू विजयाचा झेंडा अटकेपार लावू शकल्‍या. जाणून घ्‍या त्‍यांच्‍या प्रशिक्षकांविषयी.
खेळासोबत सौंदर्याचीही होते चर्चा
हेमलतांची यशस्‍वी प्रशिक्षकांमध्‍ये गणना होते. त्‍याहीपेक्षा हेमलता तिच्‍या सौंदर्यामूळे आणि हटके स्‍टाइलमुळे चर्चेत राहिली आहे. स्‍टाइलच्‍या बाबतीत हेमलता सर्वांपेक्षा हटके आहे.
बॉक्सिंमध्ये मिळवलीत अनेक पदके
हेमलता 2006 मध्ये भारतीय संघाच्या कोच झाल्या. त्यावेळी त्यांनी दिल्लीमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये भारतीय महिला बॉक्सिंग संघाला त्यांनी जगामध्ये पहिले स्थान मिळवून दिले. त्यानंतर 2007 मध्ये टर्की, 2008 मध्ये आशियाचषक, 2010 मध्ये चीन येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये त्यांच्या महिला संघाने अनेक पदके मिळवली. विशेषकरून 2012 ला मंगोलिया येथे झालेल्या आशिया चॅम्पियनशिपमध्ये भारतीय संघात बॉक्सिंग स्टार मेरी कोम आणि एल सरिता देवी यांनी हेमलताच्या मार्गदर्शनाखाली एक-एक सुवर्णपदक पटकावत तीन रजत पदकेही मिळवली होती.
खेळाडू म्‍हणूनही हेमलतांचे उत्‍कृष्‍ट प्रदर्शन
हिसारमध्ये राहणार्‍या हेमलता यांनी अल्मोडा स्टेडिअमवर आपल्या बॉक्सिंग खेळाची सुरूवात केली. उत्तराखंडच्या लमगडा ब्लॉकजवळ असलेल्या रणाऊच्या एम.एस. बगडवाल यांची कन्या हेमलता यांनी बॉ़क्सिंगमध्ये अनेक पदके मिळवली आहेत. एक खेळाडू म्हणून हेमलता यांना उत्तर प्रदेशच्या सर्वोत्कृष्ट बॉ़क्सरचा मानही मिळाला आहे. तर 2004 मध्ये दिल्लीत झालेल्या राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेमध्ये त्या प्रथम क्रमांकावर होत्या. तर 2004 मध्येच जमशेदपूर येथे झालेल्या राष्ट्रीय बॉक्सिंग खेळामध्ये त्या उत्तरांचल संघाच्या कोच होत्या.
पुढील स्‍लाइडवर पाहा, हेमलता यांची खासगी छायाचित्रे..