आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आयपीएल-6 मधील संघ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुरू होत असलेल्या आयपीएल 6 मधील टीमचा हा परिचय
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
दोन वेळा हुकला किताब
मालक : रॉयल चॅलेंजर्स स्पोर्टस प्रा. लि. कर्णधार : विराट कोहली
कोच : रे जेनिंग्स श्रेष्ठ प्रदर्शन : 2009, 2011 उपविजेता
शक्तिस्थान
०ख्रिस गेल, एल्बी डिव्हिलियर्स, विराट कोहली, दिलशान जबरदस्त फॉर्मात आहेत.
०डेन क्रिस्टियन आणि सौरभ तिवारी अष्टपैलू कामगिरी करण्यासाठी सक्षम.
०जहीर खानची वेगवान गोलंदाजी
दुबळी बाजू
०स्टार गोलंदाजांची उणीव
०अल्प प्रसिद्ध खेळाडूंची अधिक संख्या
०स्लॉग षटकात दुबळी गोलंदाजी
यांचे आहे आकर्षण
एल्बी डिव्हिलियर्स
डिव्हिलियर्सने 60 सामन्यांत 1302 धावा काढल्या.तो 2008 पासून खेळत आहे.
क्रिस गेल
गत सत्राच्या 15 मॅचमध्ये 733 धावा. यात शतकासह 7 अर्धशतकांचा समावेश.
मुथय्या मुरलीधरन
2008 ते 2012 पर्यंत 55 सामन्यांत 57 विकेट त्याने घेतल्या आहेत.
कशी असेल
कामगिरी

टॉप-4 मध्ये येण्याची शक्यता आहे. टीम किताब जिंकण्याचा प्रयत्न करेल. मात्र, यासाठी गेलवर अवलंबून राहिले जाऊ शकत नाही.
विदेशी : ख्रिस गेल, डेन क्रिस्टियन, सी. बर्नवेल, डॅनियल व्हिट्टोरी, एम. मॅकडोनाल्ड, इयान मोर्गन, एम. हेनरिक्स, मुथय्या मुरलीधरन, रवी रामपॉल, एस. जॅक्सन, तिलकरत्ने दिलशान.
देशी : विराट कोहली (कर्णधार), अभिमन्यू मिथुन, अभिनव मुकुंद, चेतेश्वर पुजारा, सौरभ तिवारी, अरुण कार्तिक, हर्षल पटेल, जयदेव उनादकट, के. अपन्ना, करुण नायर, मयंक अग्रवाल, मुरली कार्तिक, पंकज सिंग, पी. परमेश्वरन, विनय कुमार, आर. पी. सिंग, संदीप वॉरियर, सनी सोहेल, विजय झोल आणि जहीर खान.


मुंबई इंडियन्स
किताबाच्या प्रतीक्षेत

मालक । इंडिया विन स्पोर्टस प्रा. लि. कर्णधार । रिकी पाँटिंग
कोच । जॉन राइट श्रेष्ठ प्रदर्शन । 2010 उपविजेता
शक्तिस्थान
०सचिन तेंडुलकर, अंबाती रायडू, रोहित शर्मा, डॅवेन स्मिथसारखे मॅचविनर स्टार खेळाडू.
०पोलार्ड, फ्रँकलिनसारखे ऑलराउंडर खेळाडू.
०मलिंगा डेथ षटकात घातक गोलंदाज
दुबळी बाजू
०राखीवमध्ये अनभिज्ञ खेळाडूंची संख्या अधिक आहे.
०धावा देणारे अधिक गोलंदाज
या वेळचे खास आकर्षण
रिकी पाँटिंग - नेतृत्वावर असेल नजर. त्याची सचिनसोबत जुगलबंदी यशस्वी होऊ शकते.
मॅक्सवेल महागडा विकला गेला, घातक सिद्ध न होवो. याच्याकडून अष्टपैलू कामगिरीची आशा आहे.
कशी असेल
कामगिरी

सचिन आणि हरभजन संघाला विजेतेपद मिळवून देऊन शकले नाहीत. यासाठी पाँटिंगकडे नेतृत्व सोपवण्यात आले आहे.
विदेशी : रिकी पाँटिंग (कर्णधार), ए. बिजार्ड, डॅवेन स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, जे. ओरम, जेम्स फ्रँकलिन, किरोन पोलार्ड, लसिथ मलिंगा, मिशेल जॉन्सन, फिल ह्युजेस, नॉथन हिल्टर नाइल.
देशी : सचिन तेंडुलकर, अक्षर पटेल, आदित्य तारे, अंबाती रायडू, अभितोज सिंग, धवल कुलकर्णी, दिनेश कार्तिक, हरभजनसिंग, जलज सक्सेना, मुनाफ पटेल, पवन सुयल, प्रज्ञान ओझा, ऋषी धवन, रोहित शर्मा, विजय शंकर, सूर्यकुमार यादव, सुशांत मराठे, यजुवेंद्र चाहल.