(फोटी: कन्या जीवा सोबत महेंद्रसिंह धोनी)
रांची-
टीम इंडियाचा कूल कॅप्टन महेंद्रसिंह धोनी आयपीएल-8 च्या ओपनिंग सेरेमनीला रवाना होण्यापूर्वी प्रसिद्ध दिउडी मंदिराचे दर्शन घेतले. रांचीपासून 65 किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे. यावेळी धोनीसोबत पत्नी साक्षी आणि जीवा होती.
धोनी मंगळवारी दुपारी आयपीएल-8 खेळण्यासाठी रांचीहून कोलकात्याला रवाना झाला. धोनीसोबत कन्या जीवा व पत्नी साक्षी आहे. बिरसा मुंडा इंटरनॅशनल एअरपोर्टवरून इंडिगोच्या फ्लाइटने धोनी
आपल्या कुटुंबासह कोलकात्याला निघाला. धोनीला एअरपोर्टवर सोडण्यासाठी त्याचे मेव्हणे गौतम गुप्ता आणि जवळचे मित्र होते.
पप्पांच्या कुशीत होती जीवा...
धोनी एअरपोर्टवर पोहोचला तेव्हा जीवा त्याच्या कुशीत होती. जीवाला गुलाबी टॉवेलमध्ये व्यवस्थीत गुंडाळले होते. तसेच डोक्यावर कॅप आणि अंगात टी-शर्ट व आर्मी पेंट असा धोनीचा लूक होता. कडक सुरक्षेत धोनी एअरपोर्टवर पोहोचला. धोनीची एक झलक पाहाण्यासाठी एअरपोर्टवर त्याच्या फॅन्सनी एकच गर्दी केली होती.
पुढील स्लाइडवर पाहा, धोनी, साक्षी आणि जीवाची छायाचित्रे...