आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पराभूत कर्णधार धोनीची अ‍ॅडिलेडच्या ‘वाइनरीज’ला भेट!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अ‍ॅडिलेड - अ‍ॅडिलेड कसोटीत खेळण्यावर आलेली बंदी महेंद्रसिंग धोनीच्या पथ्यावरच पडली आहे. कप्तानपद आणि फलंदाज या दोन्ही जबाबदा-यांपासून मिळालेल्या हंगामी मुक्ततेचा लाभ घेऊन महेंद्रसिंग धोनी आपल्या पत्नीसह येथील वाइन तयार करणा-या कंपन्यांना भेट देऊन आला. अ‍ॅडिलेड हे वाइन उत्पादनासाठी जगप्रसिद्ध आहे. एकट्या अ‍ॅडिलेडमध्ये सुमारे 50 वाइन कंपन्या आहेत. त्यातील काही सर्वाधिक प्रसिद्ध असलेल्या कंपनीतील एक आहे अ‍ॅडिलेड हिल्स. 1844 मध्ये येथील वाइन क्विन व्हिकोटरियाला भेट देण्यात आली होती. अशा या जगप्रसिद्ध ‘वाइनरी’ला महेंद्रसिंग धोनी आणि त्याची पत्नी साक्षी यांनी आज सकाळी भेट दिली.
महेंद्रसिंग धोनी बुधवारीच येथे पर्थहून दाखल झाला. अ‍ॅडिलेड येथील कसोटीत खेळायचे नसले तरीही उद्या शुक्रवारी धोनी सरावासाठी ‘नेट’ला उपस्थित राहणार आहे.

भारतीय खेळाडूंची शॉपिंग
आॅस्ट्रेलियाविरुद्ध सलग तीन कसोटी सामन्यात लाजिरवाणा पराभव स्वीकारल्यानंतर टीम इंडियाचे खेळाडू खडबडून जागे होतील, अशी तमाम चाहत्यांना
आशा होती. चौथ्या कसोटीच्या तयारीसाठी पुरेसा वेळ असताना
टीम इंडियाचा कर्णधार धोनी,
राहुल द्रविड आणि प्रज्ञान ओझा
आदी खेळाडूंनी अ‍ॅडिलेड येथे शॉपिंगला अधिक वेळ देणे
पसंत केले.