आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Team India Celebreating Its Happiness Through Drivinge

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विजयी टीम इंडियाने ड्रायव्हिंगच्या माध्‍यमातून लुटला आनंद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नोएडा - ऑस्ट्रेलियाला क्लीन स्वीप दिल्यानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंनी नोएडा येथील बुद्ध इंटरनॅशनल सर्किटवर (बीआयसी) जाऊन आनंद साजरा केला. या वेळी टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरसह इतर खेळाडूंनी ड्रायव्हिंगचा आनंद लुटला.

रविवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध 4-0 ने मालिका विजय मिळवल्यानंतर टीम इंडियाने फॉर्म्युला वन ट्रॅकवर ड्रायव्हिंगमध्ये वेळ घालवला.
हेलकॅट बाइक चालवली धोनीने - बाइकचा शौकीन असलेल्या धोनीने सर्किटवर एक्स वन हेलकॅट बाइक चालवली. ही गाडी त्याने मागच्या वर्षी खरेदी केली होती. क्रिकेटशिवाय धोनीचे बाइकवरील प्रेम जगजाहीर आहे. यामुळे धोनीने एफआयएम सुपरस्पोर्ट वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये आपली स्वत:ची एक टीम खरेदी केली होती.
ईशांतची ऑडीची स्वारी - टीम इंडियाची युवा ब्रिगेडसुद्धा या वेळी उपस्थित होती. वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा आपली ऑडी आरएक्स फाइव्ह घेऊन आला, तर युवा स्टार विराट कोहलीने स्पोर्ट्स कार चालवली. फिरकीपटू प्रज्ञान ओझाने कर्णधार धोनीची बाइक आणि ईशांतची कार चालवून आपली हौस
भागवली. याशिवाय अजिंक्य रहाणेनेसुद्धा स्पीडचा आनंद लुटला.
सचिनने टॅक्सी राइड केली
मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेसुद्धा बुद्ध सर्किटवर मौजमजा केली. बीआयसी अधिकाºयांनी सचिनला सर्किटवर टॅक्सी राइड करण्यास मदत केली. यापूर्वी, 2011 मध्ये सचिनच्या हस्तेच इंडियन ग्रां.प्री.च्या पहिल्या स्पर्धेला हिरवा झेंडा दाखवून सुरुवात झाली होती.
सर्वकाही जबरदस्त
येथे सर्वकाही जबरदस्तच होते. हा अनुभव माझ्यासाठी खूपच चांगला ठरला. मी यापूर्वी कधीही इतक्या वेगाने गाडी चालवली नव्हती.’ - विराट.
बुद्ध इंटरनॅशनल सर्किटवर भारतीय क्रिकेटपटूंची टिपलेली छबी.