Home | Sports | From The Field | team india first practice match against australia first day

ऑस्‍ट्रेलिया इलेव्‍हनचा डाव पहिल्‍या दिवशी 6/398 धावांवर घोषित

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 15, 2011, 11:05 AM IST

ऑस्‍ट्रेलिया दौ-यावर गेलेल्‍या टीम इंडियाने पहिल्‍या सराव सामन्‍यात नाणेफेक जिंकून पहिल्‍यांदा गोलंदाजी करण्‍याचा निर्णय घेतला.

 • team india first practice match against australia first day

  कॅनबेरा- ऑस्‍ट्रेलिया दौ-यावर गेलेल्‍या टीम इंडियाच्‍या पहिल्‍या सराव सामन्‍यात ऑस्‍ट्रेलिया चेअरमन्‍स इलेव्‍हनने पहिल्‍या दिवशीचा खेळ संपताना आपला पहिला डाव सहा गडयांच्‍या बदल्‍यात 398 धावांवर घोषित केला.
  रॉबिन्‍सन आणि कूपरच्‍या शानदार शतकाच्‍या जोरावर ऑस्‍ट्रेलियन चेअरमन्‍स इलेव्‍हनने टीम इंडियासमोर मजबूत लक्ष्‍य ठेवले. टीम इंडियाकडून उमेश यादवने सर्वात जास्‍त विकेट मिळवल्‍या. त्‍याने तीन गडी बाद केले. त्‍याशिवाय प्रग्‍यान ओझाने दोन विकेट आणि विनय कुमारने एक विकेट घेतली.
  टीम इंडियाने नाणेफेक जिंकून पहिल्‍यांदा गोलंदाजी करण्‍याचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांनी चांगली सुरूवात केली. 14 धावांवर त्‍यांना पहिले यश मिळाले. ब्रॉडने 8 धावा केल्‍या. त्‍याला उमेश यादवने टिपले. त्‍यानंतर प्रग्‍यान ओझाने बर्न्‍सला 21 धावांवर बाद केले. रॉबिन्‍सन आणि कपूर जोडीने ऑस्‍ट्रेलियाचा डाव चांगलाच सावरला आणि तिस-या गडयासाठी शतकीय भागीदारी केली.
  रॉबिन्‍सनने 143 धावा बनवल्‍या त्‍याला ओझाने बाद केले. आपल्‍या या खेळीत त्‍याने 13 चौकार आणि सहा षटकार लगावले. रॉबिन्‍सन बाद होताच कूपरनेही शतक साजरा केले. तो 182 धावांवर नाबाद राहिला. कूपरने आपल्‍या खेळीत 24 चौकार आणि तीन षटकार लगावले.
  टीम इंडियाला डूलनच्‍या रूपात चौथे यश मिळाले. 29 धावांवर तो उमेश यादवच्‍या गोलंदाजीवर बाद झाला. त्‍यानंरत लगेचच यादवने मॅक्‍सवेलला पॅव्‍हेलियनमध्‍ये पाठवले. सोल्‍वेच्‍या रूपात टीम इंडियाला सहावी विकेट मिळाली. त्‍याला फक्‍त पाच धावा करता आल्‍या. विनयकुमारने त्‍याला टिपले.
  नाणेफेक
  ऑस्‍ट्रेलिया दौ-यावर गेलेल्‍या टीम इंडियाने पहिल्‍या सराव सामन्‍यात नाणेफेक जिंकून पहिल्‍यांदा गोलंदाजी करण्‍याचा निर्णय घेतला. कर्णधार मह‍ेंद्र सिंह धोनी यासामन्‍यात खेळणार नाही. त्‍याच्‍याजागी राहुल द्रविड टीम इंडियाचे नेतृत्‍व करीत आहे. ऑस्‍ट्रेलिया विकेटची माहिती होण्‍यासाठी संघात युवा खेळाडूंची निवड करण्‍यात आली आहे.
  टीम इंडिया
  राहुल द्रविड, गौतम गंभीर, सचिन तेंडूलकर, व्‍हीव्‍हीएस लक्ष्‍मण, विराट कोहली, वृद्धिमन साहा, ईशांत शर्मा, उमेश यादव, प्रग्‍यान ओझा, अभिमन्‍यु मिथुन आणि विनय कुमार
  ऑस्‍ट्रेलिया चेअरमन्‍स इलेव्‍हन
  रॉबिन्‍सन, रेयॉन बोर्ड, जे बर्न्‍स, टी कपूर, ए डूलन, जी मैक्‍सवेल, डी साल्‍वे, टी लुडेमन, सी बोयसे, जे टेलर आणि जे हेबरफील्‍ड

Trending