आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आफ्रिकेत टीम इंडियाचे पितळ उघडे,141 धावांनी पराभव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जोहान्सबर्ग - सर्वाधिक कठीण समजल्या जाणा-या दक्षिण आफ्रिकेच्या दौ-यातील पहिल्या वनडेतच टीम इंडियाचे पितळ उघडे पडले. वेगवान गोलंदाजांना अनुकूल खेळपट्ट्यांवर सुरुवातीला भारतीय गोलंदाजांना धाप लागली. नंतर आफ्रिकेच्या तुफानी मा-यापुढे आपल्या फलंदाजांनी नांग्या टाकल्या. यजमान आफ्रिकेने पहिल्या वनडेत भारताचा 141 धावांनी पराभव केला. मालिकेतील दुसरा वनडे 8 डिसेंबर रोजी डर्बन येथे होईल.
आफ्रिकेच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांना धो-धो धुतले. सलामीवीर युवा खेळाडू डी. कॉकने (135) शतक ठोकले. त्याच्याशिवाय हाशिम आमला (65), कर्णधार डिव्हिलर्स (77) आणि जे. पी. डुमिनी (नाबाद 59) यांच्या फलंदाजीमुळे आफ्रिकेने 50 षटकांत 4 बाद 358 धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युत्तरात भारताला 41 षटकांत सर्वबाद 217 धावाच काढता आल्या. भारताकडून कर्णधार धोनीने सर्वाधिक (65) धावा काढल्या. जडेजाने 29 धावा काढल्या. इतरांनी निराशा केली. अधिक वाचण्‍यासाठी क्लिक करा पुढच्‍या स्‍लाईडला...