आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Team India For New Zealand Tour Cricket News In Marathi

का मिळाला युवराजला नारळ, कोण ठरले ओझाच्या मार्गातील अडसर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मध्य प्रदेशचा वेगवान गोलंदाज ईश्वर पांडे, कर्नाटकचा अष्टपैलू खेळाडू स्ट्युअर्ट बिन्नी आणि गोलंदाज वरुण अ‍ॅरोन यांनी न्यूझीलंड दौर्‍यावर जाणार्‍या भारतीय संघात स्थान मिळविले आहे. अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग याला आणि डावखुरा फिरकी गोलंदाज प्रग्यान ओझा, मोहित शर्मा यांना या दौर्‍यातून वगळण्यात आले आहे.
मुंबईत निवड समितीने मंगळवारी 5 एकदिवसीय व 2 कसोटी सामन्यांच्या न्यूझीलंड दौर्‍यावर जाणार्‍या भारतीय एकदिवसीय व कसोटी संघाची घोषणा केली.
दरम्यान, गतवर्षी अनेक वेळा युवीला संधी देण्यात आल्या. मात्र, त्याला निवड समितीचा विश्वास सार्थकी लावता आला नाही. त्यामुळे या दौर्‍यात त्याला समितीने वगळण्याचा निर्णय घेतला.

पुढील स्लाइडमध्ये, काय कारण आहे ईश्वर पांडे, स्ट्युअर्ट बिन्नी, वरुण अ‍ॅरोनच्या एन्ट्रीचे..