आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई- येत्या 16 मार्चपासून आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेला प्रारंभ होत आहे. विश्वचषक जिंकण्याचे लक्ष्य समोर ठेवून भारतीय संघ स्पर्धेत सहभागी होणार आहे. येत्या 14 मार्च रोजी टीम इंडिया बांगलादेशला रवाना होईल.
कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया स्पर्धेत खेळणार आहे. नुकतेच विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताला आशिया चषकात समाधानकारक कामगिरी करता आली नाही. आशिया चषकातील अपयशाला दूर सारून स्पर्धेत दमदार कामगिरी नोंदवण्याचा भारताचा प्रयत्न असेल. 21 मार्च रोजी भारत आणि पारंपरिक कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान यांच्यात सामना रंगणार आहे.
तत्पूर्वी, स्पर्धेच्या तयारीसाठी भारतीय संघ 17 मार्चला र्शीलंका आणि 19 मार्चला इंग्लंडविरुद्ध सराव सामना खेळणार आहे. सलग पराभवामुळे आता टी-20 मध्ये विजयाचे आव्हान भारतापुढे असेल.
भारतीय संघ
महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, सुरेश रैना, युवराज सिंग, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहंमद शमी, स्टुअर्ट बिन्नी, अमित मिर्शा, वरुण अँरोन.
वर्ल्डकपसाठी शिखर धवन सज्ज!
भारतीय संघाचा शिखर धवन आगामी विश्वचषक टी-20 क्रिकेट स्पर्धेसाठी सज्ज झाला. येत्या 16 मार्चपासून या स्पर्धेला सुरुवात होत आहे. ‘मागील दक्षिण आफ्रिका दौर्यातील अपयशातून मला बरेच काही शिकता आले. याचा फायदा आता टी-20 स्पर्धेत होईल. आफ्रिकेच्या वेगवान पिचवर फटका मारण्याची घाई करू नये, हे शिकवले. या दौर्यात मी समाधानकारक कामगिरी करू शकलो नाही. मात्र त्यानंतर मी माझ्या सुमार खेळीचा अभ्यास केला. यातून मला अनेक चुकांची जाणीव झाली. या स्पध्रेत सवरेत्कृष्ट कामगिरी करणार असल्याचेही तो म्हणाला. या स्पर्धेसाठी आतापर्यत कसून सराव केला आहे. यात स्वत:ला सिद्ध करण्यात कोणतीही कसर सोडणार नसल्याचेही त्याने या वेळी सांगितले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.