आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इतिहास रचून भरून काढली एका धावेची कसर...सर्वात मोठया विजयासह निवृत्त झाला सचिन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीम इंडियाने दोन कसोटी सामन्‍यांच्‍या मालिकेत कॅरेबियन टीमला क्लिन स्‍वीप करत मास्‍टर ब्‍लास्‍टरला संस्‍मरणीय निरोप दिला आहे.

टीम इंडियाने मुंबईत खेळण्‍यात आलेल्‍या दुस-या कसोटीत एक डाव आणि 126 धावांच्‍या अंतराने विजय मिळवला. भारतीय कसोटी इतिहासात कॅरेबियन टीमला क्लिन स्‍वीप देण्‍याची टीम इंडियाची ही पहिलीच वेळ आहे.

यापूर्वी टीम इंडियाने कॅरेबियन टीमला पाच कसोटी सामन्‍यांच्‍या मालिकेत पराभूत केले. परंतु, त्‍यांना क्लिन स्‍वीप करता आले नव्‍हते. एका डावाच्‍या आधारावर विंडीजवरील हा सर्वात मोठा विजय आहे.

दोन वर्षांपूर्वी टीम इंडिया अवघ्‍या एका धावेने कॅरेबियन टीमला क्लिन स्‍वीप करण्‍यापासून चुकली होती. या विजयाबरोबर धोनी ब्रिगेडने या एका धावेची कसर भरून काढली आहे. पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून जाणून घ्‍या कशा पद्धतीने टीम इंडियाने पटकाविले हे स्‍थान...