आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीम इंडियाची मला लाज वाटते - कपिलदेव

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौ-यावर असलेल्या भारतीय क्रिकेट संघाच्या निराशाजनक कामगिरीची एक क्रिकेटपटू म्हणून मला लाज वाटते, अशी जळजळीत प्रतिक्रिया भारताचे माजी कप्तान कपिलदेव यांनी येथे व्यक्त केली आहे. लंडन ऑलिम्पिकला जाणा-या भारतीय खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी आयोजित करण्यात येणा-या ‘गो फॉर गोल्ड’ या क्रीडाज्योतीच्या अनावरणप्रसंगी कपिलदेव बोलत होते.
भारतीय क्रिकेट संघाच्या ऑस्ट्रेलिया दौ-यातील कामगिरीबाबत काळजी व्यक्त करताना कपिलदेव पुढे म्हणाले, ‘‘एक खेळाडू म्हणून या संघाची मला लाज वाटते. कारण ते सध्या चांगले खेळत नाहीत. खेळाच्या प्रत्येक विभागात त्यांच्या चुका होताहेत.’’ मात्र कपिलदेवने लगेच आपल्या सहका-यांना सावरून घेतले आहे. तो पुढे म्हणाला, ‘‘याच संघाने वर्ल्डकप जिंकला होता. हाच संघ कसोटी क्रिकेटमध्ये सहा महिन्यांपूर्वी नंबर वनचा संघ होता. त्यामुळे त्यांना नावे ठेवणेही गैर आहे. याच खेळाडूंनी कितीतरी वेळा आपली मान अभिमानाने उंचावली होती. आता ते जर चांगले खेळत नसतील, तर त्याबाबत काय बोलावे.’’ विद्यमान कसोटी मालिकेत भारतीय क्रिकेट संघ तिन्ही कसोटी सामने हरलाच नाही तर प्रत्येक कसोटी सामन्यात पाचव्या दिवसापर्यंतही झुंज देण्याची जिद्द दाखवू शकला नाही. मात्र कपिलदेव यांनी या अपयशाचा दोष टी- 20 क्रिकेटला देण्यास नकार दिला.
‘‘भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलियातील निराशाजनक कामगिरीला टी-20 किंवा कमी षटकांचे क्रिकेट जबाबदार नाही, असे कपिलदेव यांनी स्पष्ट केले. सध्या मालिका सुरू असताना संघात फारसे बदलही करू नयेत, असा सल्लाही त्यांनी दिला आहे. सध्याचा भारतीय संघ उत्तम संघ आहे. त्यांनी एकत्रितपणे चांगली कामगिरी करण्याची गरज आहे. त्यांनी एकसंघ होऊन लढा देण्याची गरज आहे.
कपिलदेव यांनी भारतीय क्रिकेट रसिकांनादेखील सबुरीचा, संघावर विश्वास टाकण्याचा सल्ला दिला आहे. अनावश्यक सनसनाटी निर्माण करण्याची ही वेळ नाही. या संघाला स्वत:च्या कर्र्तृत्वावर विश्वास ठेवण्याची गरज आहे. कप्तानाने स्वत:च्या आणि संघाच्या कामगिरीवर लक्ष केंद्रित करण्याची
गरज आहे. पुनरागमनासाठी संघाने प्रयत्नशील राहिले पाहिजे. त्या प्रयत्नांना आपण सर्वांनी साथ दिली पाहिजे.’’ असे ते म्हणाले.
‘अ‍ॅडिलेड’ खेळपट्टीवरही लागणार टीम इंडियाचा कस!
टीम इंडियाचा ‘ब्रँड’बाजा; बाजार उठला!