आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चॅम्पियन टॉफी: श्रीलंकेवर मात करून भारताची अंतिम सामन्यात धडक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कार्डिफ - वर्ल्डकप चॅम्पियन टीम इंडियाने आपल्या लौकिकानुसार खेळ करीत श्रीलंकेला 8 गड्यांनी हरवले. या विजयासह भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये प्रवेश केला. भारताच्या विजयात शिखर धवन (68) आणि विराट कोहली (नाबाद 58) यांचे योगदान महत्त्वाचे ठरले. आता यजमान इंग्लंडविरुद्ध फायनल लढत रविवार, 23 जून रोजी होईल. भारतीय गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी करताना श्रीलंकेला अवघ्या 8 बाद 181 धावांवर रोखले. यानंतर भारताने 35 षटकांत 2 गड्यांच्या मोबदल्यात लक्ष्य गाठले.


शिखरच्या दोन महत्त्वपूर्ण भागीदा-या
शिखरने पहिल्या विकेटसाठी रोहित शर्मासोबत (33) महत्त्वपूर्ण 77 धावांची सलामी दिली. यानंतर त्याने दुस-या विकेटसाठी विराट कोहलीसोबत 65 धावा जोडल्या. शिखरशिवाय विराट कोहलीनेसुद्धा शानदार 58 धावा काढल्या. त्याने 1 षटकार आणि 4 चौकार मारले.


तिस-यांदा फायनलमध्ये टीम इंडिया
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताने तिस-यांदा फायनल गाठली. पहिल्यांदा 2000-01 मध्ये फायनलमध्ये प्रवेश केला होता. त्या वेळी न्यूझीलंडने 4 विकेटने हरवले. दुस-यांदा 2002-02 मध्ये भारताने अंतिम फेरीत धडक दिली. त्या वेळी फायनलमध्ये पाऊस आल्याने भारत श्रीलंकेसोबत संयुक्त विजेता ठरला.


तत्पूर्वी श्रीलंकेकडून अँग्लो मॅथ्यूजने 51 धावा आणि महेला जयवर्धनेने 38 धावा काढल्या. या दोघांशिवाय इतर फलंदाजांनी निराश केले. भारताने नाणेफेक जिंकून श्रीलंकेला प्रथम फलंदाजीसाठी बोलावले. भारताच्या भुवनेश्वरकुमार आणि ईशांत शर्मा यांच्या स्विंग गोलंदाजीला श्रीलंकन फलंदाजांना समर्थपणे खेळता आले नाही. श्रीलंकेची सुरुवात वाईट झाली. त्यांचे तीन फलंदाज अवघ्या 41 धावांत पॅव्हेलियनमध्ये परतले. चौथ्या विकेटसाठी कर्णधार मॅथ्यूज आणि जयवर्धने यांनी 78 धावांची भागीदारी करून संघाचा स्कोअर पुढे नेला. जयवर्धनेला (38) रवींद्र जडेजाने त्रिफळाचीत केले. श्रीलंकन संघ संकटात सापडला असताना कर्णधार मॅथ्यूजने 51 धावा काढल्या.

पुढील स्लाइडमध्ये, दमदार जोडीविषयी