आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Team India Performance After Sachin Tendulkar Retirement

वेस्टइंडीज संघ जाऊ शकतो संपावर, पहिला एकदिवस सामन्‍यावर टांगती तलवार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: डॅरेन सामी आणि धोनी)
भारत आणि वेस्टइंडीज यांच्‍यामधील पाच सामन्‍याची वनडे सीरीज आज (बुधवार) पासून सुरु होत आहे. सामन्‍याचे थेट प्रसारण स्टार स्पोट्‌र्सवरुन दुपारी अडीच वाजता प्रसारीत होईल. परंतु या सामन्‍यावर टांगती तलवार आली आहे. वेस्टइंडीज क्रिकेट संघ आपल्‍या सॅलरीसाठी वेस्टइंडीज क्रिकेट बोर्डवर नाराज आहे. त्‍यामुळे वेस्‍ट इंडीज संघातील खेळाडू संपावर जावू शकतात.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर चा निवृत्‍तीनंतर टीम इंडिया प्रथमच त्‍यांच्‍याशिवाय मायदेशात एकदिवसीय मालिका खेळणार आहे. भारताने 2013 मध्‍ये वेस्‍ट इंडीजला 2-0 ने पराभूत केले होते. त्‍या मालिकेनंतर सचिनने क्रिकेटमधून निवृत्‍ती घेतली होती. या घटनेला जवळपास एक वर्ष होत आहे.
सचिनच्‍या गैरहजेरीत कशी असणार रणनीती?
सचिन संघात असताना भारतीय फलंदाजी जगातील अव्‍वल मानली जात होती. त्‍याचा गैरहजेरीत भारतीय संघ कशी रणनीती आखणार याकडे सर्व क्रीडाचाहत्‍यांचे लक्ष लागले आहे. धोनीची रणनीती भारताला वेस्‍ट इंडीज विरुध्‍द विजय मिळवून देवू शकेल काय ? असा क्रिकेटप्रेमींसमोर प्रश्‍न आहे.
क्रिकेटमधील कसोटी आणि एकदिवसीय प्रकारात सर्वांधीक सामने, सर्वांधीक धावा, सर्वांधीक शतके, सर्वांधीक विश्‍व विक्रम सचिनच्‍या नावावर आहेत. सचिनने 2013 मध्‍ये आपल्‍या होम ग्राउंड मुंबई मध्‍ये 200 वा कसोटी सामना खेळून आंतरराष्‍ट्रीय क्रिकेटमधून निवृत्‍ती घेतली होती.
पुढील स्‍लाइडवर वाचा, 9 कसोटीमध्‍ये कोणासोबत हरला भारतीय संघ?