Home | Sports | From The Field | team india practice match 2 day images

विराट कोहलीची दमदार खेळी पाहा छायाचित्रातून...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 20, 2011, 05:54 PM IST

ऑस्‍ट्रेलिया दौ-यावर गेलेल्‍या टीम इंडियाने ऑस्‍ट्रेलिया चेअरमन्‍स इलेव्‍हन विरूद्धच्‍या सामन्‍यातील दुस-या दिवशी विराट कोहलीने शानदार शतक लगावले.

 • team india practice match 2 day images

  कॅनबेरा- ऑस्‍ट्रेलिया दौ-यावर गेलेल्‍या टीम इंडियाने ऑस्‍ट्रेलिया चेअरमन्‍स इलेव्‍हन विरूद्धच्‍या सामन्‍यातील दुस-या दिवशी विराट कोहलीने शानदार शतक लगावले. त्‍यानंतर अश्विनच्‍या जादुई फिरकीने ऑस्‍ट्रेलियावर थोडेफार नियंत्रण मिळवले. चेअरमन्‍स इलेव्‍हनच्‍या कोवाननेही शतक लगावून डाव सावरण्‍याचा प्रयत्‍न केला.
  कोहलीच्‍या शतकीय खेळीमुळे टीम इंडियाने पहिल्‍या डावात 269 धावा बनवल्‍या. उत्‍तरादाखल चेअरमन्‍स इलेव्‍हनची सुरूवात चांगली झाली नाही. पण त्‍यांच्‍या कोवानने शतक झळकावून संघाला मजबूती प्राप्‍त करून्‍ा दिली. अश्विनच्‍या फिरकीने चेअरमन्‍स इलेव्‍हनचे चार गडी तंबूत परतले. अश्विनच्‍या घातक गोलंदाजीसमोर चेअरमन्‍स एकादशने सात गडयांच्‍या बदल्‍यात 214 धावा बनवल्‍या आहेत. ते अजूनही 55 धावांनी मागे आहेत.
  दुस-या दिवशीचा खेळ पाहा फोटोंमधून... • team india practice match 2 day images
 • team india practice match 2 day images
 • team india practice match 2 day images
 • team india practice match 2 day images

Trending