Home | Sports | From The Field | team india practice match test live 2nd day

सराव सामना- अश्विनच्‍या फिरकीने सावरले टीम इंडियाला

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 20, 2011, 10:54 AM IST

यापूर्वी विराट कोहलीच्‍या शानदार शतकामुळे टीम इंडियाने पहिल्‍या डावात 269 धावा केल्‍या.

 • team india practice match test live 2nd day

  कॅनबेरा- क्रिकेट ऑस्‍ट्रेलिया चेअरमन्‍स विरूद्धच्‍या दुस-या सराव सामन्‍यात टीम इंडियाकडून विराट कोहलीने शानदार शतक लगावून भारतीय डावाला आकार देण्‍याचा प्रयत्‍न केला तर आर अश्विनने दुस-या दिवशीचा खेळ संपताना चार गडी टिपून चेअरमन्‍स संघाला थोपवण्‍याचे काम केले. दुस-या दिवशीचा खेळ संपेपर्यंत अश्विनने चार विकेट आपल्‍या नावे केल्‍या.
  सराव सामन्‍याच्‍या दुस-या दिवशी खेळ संपताना ऑस्‍ट्रेलिया चेअरमन संघाची धावसंख्‍या सात गडी बाद 214 झाली आहे. ल्‍यूडमेन 15 धावांवर नाबाद आहे. टीम इंडियाने पहिल्‍या डावात 269 धावा जमवल्‍या. चेअरमन्‍स एलेव्‍हन अजूनही 55 धावांनी पिछाडीवर आहे. अद्याप त्‍यांचे तीन खेळाडू शिल्‍लक आहेत.
  ई.कोवानने ऑस्‍ट्रेलिया चेअरमन्‍स एलेव्‍हनकडून आक्रमक शतक ठोकले. त्‍याने 147 चेंडूमध्‍ये आपले शतक पूर्ण केले. शतकानंतर अश्विनने त्‍याला 109 धावांवर टिपले. आपल्‍या शतकी खेळीत त्‍याने 16 चौकार लगावले.
  टीम इंडियाला अभिमन्‍यू मिथूनने पहिले यश मिळवून दिले. त्‍याने वॉर्नरला 2 धावेवर बाद केले. त्‍यानंतर उमेश यादवने ख्‍वाजाला त्‍याच्‍या वैयक्‍तीक 25 धावांवर तंबूत धाडले. अश्विनने ह्यूग्‍सला 20 धावांवर टिपले.
  अश्विने डूलनच्‍या रूपात टीम इंडियाला पाचवे यश मिळवून दिले. डूलनला खातेही खोलता आले नाही. डूलन नंतर अश्विनने कपूरलाही बाद केले. प्रग्‍यान ओझाने बोयसला बाद करून ऑस्‍ट्रेलिया चेअरमन्‍स इलेव्‍हनला सातवा झटका दिला.
  टीम इंडियाचा पहिला डाव
  यापूर्वी विराट कोहलीच्‍या शानदार शतकामुळे टीम इंडियाने पहिल्‍या डावात 269 धावा केल्‍या1. कोहलीने 171 चेंडूचा सामना करताना 132 धावा केल्‍या. आपल्‍या शतकी खेळीत त्‍याने 18 चौकार आणि 2 षटकार लगावले. रोहित शर्मानेही 47 धावा करून कोहलीला चांगली साथ दिली. याशिवाय गौतम गंभीरने 24, व्‍हीव्‍हीएस लक्ष्‍मणने 15 धावा, धोनीने 3 धावा, अश्विनने 4, विनय कुमारने नाबाद 6, झहीर खानने 4 धावा तर अभिमन्‍यु मिथुनने 0 धावा जमवल्‍या.

Trending