आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीम इंडिया निराशाजनक नीचांकानजीक

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पर्थ - भारतीय क्रिकेट संघ, कसोटी क्रिकेटमधील सलग (परदेशातील) आठ कसोटी सामन्यांच्या पराभवाच्या निराशाजनक कामगिरीच्या नीचांकाच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचला आहे. अ‍ॅडिलेड येथे येत्या 24 जानेवारीपासून सुरू होणाºया कसोटीत भारतीय संघाचा पराभव झाल्यास 79 वर्षांच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील तो एक नीचांक असेल.
भारतीय क्रिकेटपटूंनी आज हॉटेलमध्येच स्वत:ला कोंडून घेतले होते. चाहत्यांना सामोरे जाण्याचे टाळणाºया भारतीय संघासमोर, सलग आठव्या पराभवाची नामुष्की टाळण्याचे आव्हान आता उभे ठाकले आहे.
79 वर्षांत 461 कसोटीदरम्यान 1967 मध्ये टायगर पतौडीच्या नेतृत्वाखाली भारताने इंग्लंडविरुद्ध मालिका 0-3 अशी तर आॅस्ट्रेलियाविरुद्ध मालिका 0-4 अशी गमावली होती. त्याआधी आठ वर्षांपूर्वी भारताने 1958-59 च्या सुमारास 5-5 सामन्यांच्या दोन कसोटी मालिकेतील 8 कसोटी सामने गमाािले होते. त्या वेळी भारताने वेस्ट इंडीज आणि आॅस्ट्रेलियाविरुद्ध मालिका गमावली होती. मात्र धोनीच्या भारतीय संघापेक्षा पतौडीच्या संघाने सन्मानजनक पराभव स्वीकारले होते. त्यांनी 7 पैकी केवळ दोनच कसोटी सामन्यांत डावाने पराभव स्वीकारला होता. धोनीच्या संघाने शेवटच्या 5 कसोटी पराभवांपैकी 4 पराभव डावाने स्वीकारले आहेत.
धोनीच्या पराभूत धुरंधरांपेक्षा पतौडीचा संघ आणखी एका बाबतीत सरस होता. पतौडीच्या संघात स्वत: पतौडी अणि एम. एल. जयसिंहा हे दोन शतकवीर होते. धोनीच्या संघात फक्त राहुल द्रविड हा एकमेव शतकवीर आहे. 386 धावांनी पिछाडीवर असलेल्या पतौडीच्या संघाने हेडिग्ले कसोटीच्या दुसºया डावात इंग्लंडला 510 धावांचे प्रत्युत्तर दिले होते. स्वत: पतौडीने त्या वेळी 148 धावांची तडफदार खेळी केली होती.
1958-59 ला भारतीय संघाने विंडीजविरुद्ध स्वगृहातील मालिका 0-3 अशी गमावली होती, तर इंग्लंडमध्ये 0-5 असा पराभव पत्करला होता. त्या वेळच्या 8 पराभवांच्या नीचांकाची धोनीचा संघ अ‍ॅडिलेड कसोटी गमावल्यास बरोबरी करण्याची शक्यता आहे.
त्या वेळच्या पराभवात आणखी वेगळेच म्हणजे त्या वेळी एकूण 4 वेगवेगळे कप्तान भारतीय संघाला लाभले होते. पॉली उम्रीगर, गुलाम अहमद, विनू मांकड आणि हेसू अधिकारी या चार कप्तानांनी भारतीय संघाचे वेगवेगळ्या कसोटीत नेतृत्व केले होते.
त्यामुळे सेहवागच्या नेतृत्वाखाली अ‍ॅडिलेड येथे होणारा अखेरचा कसोटी सामना भारतासाठी ऐतिहासिक ठरण्याची शक्यता आहे.