आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कसोटी क्रमवारीतही भारतीयांची घसरण !

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुबई - बॉर्डर-गावसकर करंडकात सलग तीन पराभवाचा फटका भारतीय क्रिकेटपटूंना आयसीसीच्या कसोटी क्रमवारीतही बसला आहे. सुमार कामगिरीमुळे भारतीय क्रिकेटपटू क्रमवारीत दणक्यात खाली कोसळले आहेत. शिवाय टीम इंडियाचे नंबर दोनचे सिंहासनही जाण्याच्या मार्गावर आहे.
फलंदाजांनी वेळोवेळी नांग्या टाकल्यामुळे भारताला विदेशात सलग सातव्या पराभवाला सामोरे जावे लागले. आता भारतीय संघाला कसोटीतील नंबर दोनचे स्थान दक्षिण आफ्रिकेसाठी रिकामे करावे लागले. खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीला वगळता इतर सर्व भारतीय फलंदाजांच्या क्रमवारीत घसरण झाली आहे. विराटने पर्थ येथे दोन्ही डावात चांगली कामगिरी करून क्रमवारीत 39 स्थानांनी झेप घेतली. आता तो 66 व्या क्रमांकावर पोहोचला आहे.
सध्या संकटात सापडलेल्या कर्णधार महेंद्रसिंग धोनीला चार स्थानांच्या घसरणीचा फटका बसला. गेल्या 24 डावांपासून महाशतकाच्या प्रतीक्षेत असलेला सचिन तेंडुलकरही तीन स्थानांनी खाली आला आहे. सचिन आता नवव्या क्रमांकावर असून, टॉपटेनच्या बाहेर होण्याच्या तो उंबरठ्यावर पोहोचला आहे. आक्रमक सलामीवीर वीरेंद्र सेहवागही दोन स्थानांच्या घसरणीसह 24 व्या क्रमांकावर आला असून, त्याचा जोडीदार गौतम गंभीर एका स्थानाने घसरून 32 व्या स्थानी पोहोचला आहे. व्ही.व्ही.एस. लक्ष्मण तीन स्थानांच्या नुकसानासह 21 व्या क्रमांकावर आहे. धोनी 40 व्या स्थानी घसरला आहे.
टॉप टेन फलंदाज
क्रम खेळाडू देश गुण
1. संगकारा श्रीलंका 850
2. जॅक कॅलिस द. आफ्रिका 846
3. ए.कुक इंग्लंड 823
4. इयान बेल इंग्लंड 822
5. डिव्हिलर्स द.आफ्रिका 815
6. युनूस खान पाकिस्तान 789
7. जे. ट्रॉट इंग्लंड 776
8. समरवीरा श्रीलंका 775
9. तेंडुलकर भारत 774
10. के.पीटरसन इंग्लंड 770
टॉप 10 गोलंदाज
क्रम खेळाडू देश गुण
1. डेल स्टेन द. आफ्रिका 896
2. जे. अँडरसन इंग्लंड 811
3. ग्रीम स्वान इंग्लंड 755
4. एस.ब्रॉड इंग्लंड 744
5. पी. सिडल ऑस्ट्रेलिया 736
6. हिल्फेनहॉस ऑस्ट्रेलिया 718
7. एम. मोर्केल द. आफ्रिका 715
8. जहीर खान भारत 705
9. सकिबूल बांगला 678
10. हेराथ श्रीलंका 660.