आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत व इंग्लंड आज चौथा एकदिवसीय सामना खेळणार

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोहाली - भारत व इंग्लंड यांच्यातील चौथा एकदिवसीय सामना आज (ता .23) पीसीए स्टेडियममध्ये होणार आहे. मालिका विजयाचे लक्ष्य गाठण्यासाठी धोनी ब्रिगेड सज्ज झाली.पाच सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघ 2-1 ने आघाडीवर आहे. यामुळे चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. प्रचंड थंडी असतानाही सामन्याच्या सर्व तिकिटांची विक्री झाली. ही लढत रंगण्याची शक्यता आहे. भारत 3-1 ने निर्णायक आघाडी घेण्यासाठी व इंग्लंड टीम बरोबरी साधण्याच्या ईर्षेने मैदानावर उतरणार आहे.

आतापर्यंत दोन्ही संघांमध्ये मालिकेतील तीन सामने झाले आहेत. भारताने दुसरा 127 धावा व तिसरा वनडे 7 गडी राखून जिंकला. पहिल्या वनडेत भारताला नऊ धावांच्या अंतराने पराभवाला सामोरे जावे लागले. भारताने इंग्लंडला रांची येथील मैदानावर हरवून आयसीसी वनडे क्रमवारीत अव्वल स्थान गाठले. धोनीच्या नेतृत्वाखाली मिळवलेल्या नंबर वनच्या सिंहासनाला वाचवण्यासाठी टीम इंडिया पूर्ण प्रयत्न करणार आहे. दुसरीकडे इंग्लंडची दुस-या स्थानावर घसरण झाली असून त्यांच्या पुन्हा नंबर वन होण्याचा प्रयत्न असेल. मोहालीतील खेळपट्टी ही वेगवान गोलंदाजांसाठी मदत करणारी आहे. यामुळे टीम इंडियाचा यावर कस लगणार आहे.
संभाव्य टीम खालीलप्रमाणे
भारत : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), गौतम गंभीर, अजिंक्य रहाणे, विराट कोहली, युवराजसिंग, सुरेश रैना, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, भुवनेश्वरकुमार, ईशांत शर्मा, अशोक डिंडा, अमित मिश्रा, शमी अहेमद.
इंग्लंड : अ‍ॅलेस्टर कुक (कर्णधार), इयान बेल, केविन पीटरसन, इयान मोर्गन, केसवेटर, समित पटेल, टीम ब्रेसनन, स्टीवन फिन, जेड डर्नबॅक, जो. रूट, जेस ट्रेडवेल, जोस बटलर, स्टुअर्ट ब्रॉड, स्टुअर्ट मिकर.

भारताच्या विजयाची कारणे
1. कसोटीतील चुकांची वनडेत सुधारणा केली.
2. भुवनेश्वर, शमी युवा गोलंदाजांचे योगदान
3. युवराजसिंग, सुरेश रैना, धोनी, जडेजा आणि विराट कोहलीची चांगली फलंदाजी
अपयशाची बाजू
1. स्लॉग ओव्हरमध्ये यॉर्कर टाकण्यात गोलंदाज अपयशी
2. रिव्हर्स स्विंगचा भुवनेश्वर, शमीमध्ये अभाव
3. ईशांत शर्माची निराशाजनक गोलंदाजी
4. अजिंक्य रहाणे सलग तीन वेळा अपयशी

विराट कोहलीने मागितली बीसीसीआयची माफी

विराट कोहलीने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची मंगळवारी माफी मागितली. त्याने रांची येथील एकदिवसीय सामन्याच्या वेळी एका दैनिकाला मुलाखत दिली होती. मात्र, बीसीसीआयच्या नियमानुसार मालिकेदरम्यान खेळाडूंना प्रसारमाध्यमांशी बोलण्यास मनाई असते. ‘या नियमाची आपल्याला माहिती नव्हती,’ अशी स्पष्टोक्ती कोहलीने दिली. आगामी काळात आपण अशी चूक पुन्हा करणार नाही, असेही तो म्हणाला. या मुलाखतीमध्ये विराट कोहलीने महेंद्रसिंग धोनीच्या कर्णधारपदाबद्दल आणि भविष्यातील भारतीय संघाच्या नव्या नेतृत्वाविषयी चर्चा केली होती.