आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युवा ब्रिगेडवर भारताची मदार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- विश्वचषकाचा किताब वाचवण्यासाठी टीम इंडियाच्या 15 खेळाडूंची घोषणा झाली आहे. एका वाक्यात टीम इंडियाचे वैशिष्ट्य सांगायचे असेल तर हा युवा संघ आहे, असे म्हणू शकतो. पूर्णपणे फिट आणि अखेरपर्यंत लढण्यास तयार. या संघात मागच्या वर्ल्डकपचे दिग्गज सचिन तेंडुलकर, युवराजसिंग, वीरेंद्र सेहवाग आणि जहीर खान नाहीत. असे असताना हा युवा संघ विजेतेपद पटकावण्यात सक्षम आहे. कारण, संघात धोनी, विराट, रोहित, रैना, धवनसारखे तगडे फलंदाज आहेत. अश्विन, जडेजासारखे उत्तम फिरकीपटू आहेत.

शक्तिस्थान
सलामी जोडी : रोहित-धवन जोडी. रोहितच्या १२६ वनडेत ५ शतके, ३७५२ धावा. ३८ ची सरासरी. धवनच्या नावे ४९ वनडेत ६ शतके, २०४६ धावा. ४६ ची सरासरी.

आव्हान
वेगवान खेळपट्या : ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडच्या वेगवान खेळपट्यांवर कामगिरी चांगली नाही. १९९२ मध्ये येथील विश्वचषकात भारताला ८ पैकी फक्त २ सामने जिंकता आले.
दुबळी बाजू
गोलंदाजी : अखेरच्या षटकात सुमार गोलंदाजी, ही आपली दुबळी बाजू. यामुळे २०१४ मध्ये भारताने अखेरच्या दहा षटकांत सर्वाधिक धावा दिल्या.

टीम इंडिया- कोणत्या खेळाडूचे काय आहे शक्तिस्थान
विराट कोहली (26)
26 वर्षांचा असताना 30 पेक्षा अधिक शतके ठोकली. शानदार तंत्र, कामगिरीत सातत्य, उत्तम मॅच फिनिशर.

रोहित शर्मा (27)
2013 -2014 मध्ये 40 सामने खेळले. 52 च्या सरासरीने 1600 धावा काढल्या. 23014 मध्ये सर्वाधिक 264 धावा.
स्टुअर्ट बिन्नी (30)
वेगवान गोलंदाजी करू शकणारा भारतीय संघातील एकमेव अष्टपैलू.
अक्षर पटेल (20)
डावखुरा फिरकीपटू आणि उपयुक्त फलंदाज. 90 कि.मी. वेगाने गोलंदाजी.