आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पराभवानंतरही भारतीय खेळाडूंनी दाखवली खेळ भावना, हा VIDEO आला समोर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक उर्दू भाषेत विराटशी संवाद साधताना, मध्यभागी पाकचे गोलंदाज प्रशिक्षक अजहर मेहमूद.... - Divya Marathi
पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक उर्दू भाषेत विराटशी संवाद साधताना, मध्यभागी पाकचे गोलंदाज प्रशिक्षक अजहर मेहमूद....
स्पोर्ट्स डेस्क- चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पाकिस्तानने भारताला 180 धावांनी पराभूत करत विजेतेपद पटकावले. मात्र, निराश टीम इंडियाने आपले दु:ख विसरून खेळ भावनेचा नमुना सादर केला. विराट कोहली, युवराज सिंगसह टीममधील अनेक खेळाडू मैदानावर विरोधी टीमला शुभेच्छा देण्यासाठी बराच वेळ थांबले होते. तसेच दोन्ही संघातील खेळाडू हसीमजाक करताना दिसले. या खेळाडूंत हास्यविनोदात संवादाचा एक व्हिडिओ आयसीसीने शेयर करत टीम इंडियाला सलाम ठोकला. व्हिडिओत दिसले हे...
 
- आयसीसीने या व्हिडिओला 'स्पिरिट ऑफ क्रिकेट' नाव दिले आहे. यात विराट पाकिस्तानी खेळाडूंशी मुक्तपणे संवाद साधताना दिसत आहे. व्हिडिओत शोएब उर्दू भाषेत काहीतरी बोलताना दिसत आहे. ज्यानंतर युवराज आणि विराट खूप हसत आहेत. तर, फखर आणि बाबर सुद्धा या व्हिडिओत दिसत आहे.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, कसे हास्यविनोदात रमले होते विराट आणि पाकिस्तानी खेळाडू...शेवटच्या स्लाईडवर व्हिडिओ...
बातम्या आणखी आहेत...