आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या दहा कारणांमुळे इंग्रजांच्‍या जमिनीवर चॅम्पियन ठरली टीम इंडिया

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चॅम्पियन्‍स ट्रॉफीमध्‍ये टीम इंडियाने धमाकेदार प्रदर्शन करत आपणच जगजेतेपद असल्‍याचे सिद्ध करून दाखवले आहे. सराव सामन्‍यापासून सुरू झालेला टीम इंडियाच्‍या विजयाचा सिलसिला फायनलपर्यंत पावसाचा अपवाद वगळता विनाअडथळा पार पडला. सततच्‍या पावसामुळे क्रिकेटप्रेमी काही प्रमाणात निराश झाले होते. त्‍यामुळे सामनाही 20-20 षटकांचाच ठेवण्‍यात आला. मात्र, नाणेफेक हरल्‍यानंतरही टीम इंडियाने हे आव्‍हान यशस्‍वीपणे पार पाडले.

आयपीएलमधील वाद घेऊनच इंग्‍लंडमध्‍ये पोहोचलेल्‍या टीम इंडियाने सर्व क्रिकेटपंडितांच्‍या भाकितावर पाणी फेरले. चॅम्पियन्‍स ट्रॉफीचे जेतेपद पटकावून कर्णधार धोनीने आपल्‍या टीकाकारांचे तोंड बंद केले आहे. 2007मधील टी-20 विश्‍वचषकात धोनीच्‍या कर्णधारपदाची जादू पहिल्‍यांदाच चालली होती. त्‍यानंतर धोनीने टीम इंडियाला यशोशिखरावर नेले. टीम इंडियासाठी त्‍याने इतिहासच रचला. फोटोंच्‍या माध्‍यमातून जाणून घेऊयात टीम इंडियाच्‍या चॅम्पियन्‍स ट्रॉफीतील विजयी रथाबद्दल...