आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

28 वर्षांनंतर इंडिया 'लॉर्ड'! लॉर्ड्स कसोटीत इंग्लंड 95 धावांनी पराभूत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन- 74 धावांत 7 बळी घेणार्‍या ईशांत शर्माच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर टीम इंडियाने विदेशी भूमीवर तीन वर्षांपासूनचा विजयाचा दुष्काळ संपवला. ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर टीम इंडियाने इंग्लंडला दुसर्‍या कसोटीत 95 धावांनी हरवले. 28 वर्षांनंतर लॉर्ड्सवरील भारताचा हा पहिला विजय आहे.

० 7 विकेट घेणारा ईशांत ‘मॅन ऑफ द मॅच’ ० मालिकेत 1-0 ने आघाडी ० पहिली कसोटी अनिर्णीत, तिसरी 27 जुलैपासून ०1124 दिवसांनंतर विदेशी भूमीवर विजय

विजयाचा सोनेरी क्षण
रवींद्र जडेजाने इंग्लंडच्या जेम्स अँडरसनला धावबाद करून भारताच्या ऐतिहासिक विजयावर शिक्कामोर्तब केले, तो क्षण.

भुवनेश्वर : 88 धावा ठोकल्या, 6 बळी.
ईशांत शर्मा : दुसर्‍या डावात 7 विकेट्स.
मुरली विजय : दुसर्‍या डावात 95 धावांची धडाकेबाज खेळी. पहिल्या डावात 24 धावा.
रवींद्र जडेजा : दुसर्‍या डावात 66 धावांची स्फोटक खेळी. सामन्यात तीन विकेट्सही.
अजिंक्य रहाणे : पहिल्या डावात 103 धावा ठोकल्या. सामन्यातील एकमेव शतक.
भारताने विश्वचषकही जिंकला होता 28 वर्षांनंतर (2011 मध्ये)

लॉर्ड्सवर चौथा विजय
1983 मध्ये कपिल देवच्या नेतृत्त्वात विश्वचषक जिंकला.
1986 मध्ये वेंगसरकरच्या शतकामुळे कसोटी जिंकली.
2002 मध्ये नेटवेस्ट ट्रॉफी जिंकली (326 धावांचे लक्ष्य गाठले. कर्णधार सौरव गांगुलीने टी-शर्ट फडकवले होते.)
2014 मध्ये पुन्हा कसोटी जिंकली. तब्बल 28 वर्षांनंतर!
शस्त्र उलटवले : स्विंग व वेग इंग्लंडचे सामर्थ्य. भुवनेश्वरचा स्विंग व ईशांतच्या शॉर्टपिच गोलंदाजीने इंग्लंडचा खेळच संपुष्टात आणला.