आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Team India With Dhoni In Kolakata For Eden Garden Stadium

धोनी अँड कंपनी कोलकात्यात दाखल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलकाता- येत्या बुधवारपासून सचिन तेंडुलकरच्या करिअरमधील 199 व्या कसोटीला ईडन गार्डनवर प्रारंभ होत आहे. या कसोटीसाठी महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ कोलकात्यात दाखल झाला आहे. ईडन गार्डनवरील सचिनच्या शेवटच्या कसोटीसाठी विशेष कामगिरी करण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल.

धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने नुकतीच ऑस्ट्रेलियाविरुद्ध सात वनडे सामन्यांची मालिका 3-2 अशा फरकाने जिंकली. विजयाची ही लय विंडीजविरुद्ध कसोटी मालिकेतही कायम ठेवण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल. भारतीय संघातील दहा खेळाडूंचे रविवारी कोलकात्याच्या नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले.

भारतीय खेळाडू कोलकात्यातच दिवाळी साजरी करणार आहेत. या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सचिनला 199 व्या कसोटीत विजयी भेट देण्याचा भारतीय संघ प्रयत्न करेल. या कसोटीसाठी विंडीज संघ देखील सज्ज झाला आहे. नुकत्याच या टीमचा उत्तर प्रदेशविरुद्धचा तीन दिवसीय सराव सामना अनिर्णीत राहिला. या सामन्यात क्रिस गेलने अर्धशतक ठोकले.