आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Team India Won Match And Series Against Sri Lanka

टीम इंडियाचा मालिका विजय!, हैदराबादेत श्रीलंकेवर सहा गड्यांनी केली मात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हैदराबाद - उमेश यादवच्या (५३ धावांत ४ विकेट) घातक गोलंदाजीनंतर सलामीवीर शिखर धवन (९१) आणि कर्णधार विराट कोहलीच्या (५३) दमदार फलंदाजीच्या बळावर टीम इंडियाने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यातसुद्धा श्रीलंकेला धुतले. हैदराबाद येथील वनडेत श्रीलंकेवर ६ गड्यांनी मात करीत भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत ३-० ने विजयी आघाडी घेतली आहे. भारताने यापूर्वी कटक आणि अहमदाबाद वनडेत श्रीलंकेवर मात केली होती. आता मालिकेतील पुढचा सामना १३ नोव्हेंबर रोजी कोलकाता येथे होईल. श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना ४८.२ षटकांत सर्वबाद २४२ धावा काढल्या. प्रत्युत्तरात टीम इंडियाने हे लक्ष्य ४४.१ षटकांत ४ गड्यांच्या मोबदल्यात २४५ धावा काढून लक्ष्य गाठले.

धवन पुन्हा तळपला
धावांचा पाठलाग करताना भारताची चांगली सुरुवात झाली. अजिंक्य रहाणे (३१) आिण शिखर धवन (९१) यांनी ११.६ षटकांत ६२ धावांची अर्धशतकी सलामी दिली. रहाणे ३१ धावा काढून परेराच्या गोलंदाजीवर बाद झाला. रहाणेने ४७ चेंडूंचा सामना करताना ५ चौकार मारले. तिस-या क्रमांकावर आलेल्या अंबाती रायडूने या वेळी ३५ धावांचे योगदान दिले. रायडूने ४६ चेंडूंचा सामना करताना ३ चौकार मारले. रायडून धावबाद झाला. रायडू आिण धवनने दुस-या विकेटसाठी महत्त्वपूर्ण अशी ६९ धावांची भागीदारी केली.

कोहलीचे अर्धशतक
भारताच्या २ बाद १३१ धावा झाल्या असताना रायडू पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याने धवनला शतकाची संधी होती. मात्र, त्याचे शतक ९ धावांनी हुकले. तो ९१ धावा काढून बाद झाला. कुलशेखराच्या चेंडूवर यष्टिरक्षक संगकाराने त्याचा झेल घेतला. धवनने ७९ चेंडूंचा सामना करताना ८ चौकार आिण १ षटकारासह ही खेळी केली. दुसऱ्या टोकाने कोहलीने अर्धशतक साजरे केले. विजयासाठी अवघ्या काही धावांची गरज असताना कोहली (५३) बाद झाला. सुरेश रैनाने नाबाद १८ तर वृद्धिमान साहाने नाबाद ६ धावांचे योगदान दिले.

श्रीलंकेची वाईट सुरुवात
श्रीलंकेने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय योग्य ठरला नाही. भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादवने लंकेचा सलामीवीर कुशल परेराला अवघ्या ४ धावांवर साहाकरवी सहाव्या चेंडूवर झेलबाद केले. तिस-या क्रमांकावर खेळण्यास आलेला श्रीलंकेचा अनुभवी खेळाडू आणि माजी कर्णधार कुमार संगकाराला तर भोपळासुद्धा फोडता आला नाही. त्याला यादवने अश्विनकरवी झेलबाद केले.

उमेश यादवच्या ४ विकेट
भारताकडून उमेश यादवने (४/५३) शानदार गोलंदाजी केली. श्रीलंकेसाठी तोच सर्वात अधिक अडचणीचा ठरला. त्याने सुरुवातीला दोन षटकांत दोन विकेट घेतल्या. फिरकीपटू अक्षर पटेलने ४० धावांत ३ गडी बाद केले.

जयवर्धनेचे झुंजार शतक
सात धावांवर २ विकेट गमावणा-या श्रीलंकेचा डाव जयवर्धने (११८) आणि दिलशानने (५३) सांभाळला. दोघांनी १०५ धावांची शतकी भागीदारी करून श्रीलंकेला ११२ धावांपर्यंत पोहोचवले. रायडूने दिलशानला बाद केले. यानंतर श्रीलंकेचे फलंदाज खेळपट्टीवर िटकले नाही. दुसऱ्या टोकाने महेला जयवर्धनेने १२४ चेंडूंचा सामना करताना ११८ धावा काढल्या. त्याने १२ चौकार आणि १ षटकार खेचला.

शिखर धवन सर्वात पुढे
भारताकडून या मालिकेत धावा काढण्याबाबत शिखर धवन सर्वात पुढे आहे. त्याने तीन वनडेत ११३, ७९, ९१ अशा एकूण २८३ धावा काढल्या आहेत. आजच्या खेळीत त्याने वनडेत २ हजार धावांचा टप्पाही गाठला.
पुढील स्लाइड्सवर पाहा, दोन्ही संघाचे धावफलक