आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Team Party At Mahendra Singh Dhoni House, Divya Marathi

PIX: धोनीच्‍या घरी रात्री उशीरापर्यंत चालली पार्टी, चेन्‍नई संघाने केली धम्‍माल मस्‍ती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आयपीएलच्या ग्लॅमरस टी-20 लीगच्या सातव्या मोसमाच्या पूर्वार्धातील ‘आखाती’ पाहुणचार 30 एप्रिल रोजी आटोपला. आता मायदेशातील खमंग तडक्याला रांची येथील जेएससीए स्टेडियमवर आजपासून (दि. 2) दमदार चेन्नई सुपर किंग्ज व कोलकाता नाइट रायडर्स यांच्यातील लढतीने सुरुवात होत आहे. रात्री आठपासून हा सामना आहे. त्यामुळे सार्वत्रिक निवडणूक अंतिम टप्प्याकडे झुकत असताना देशात पुन्हा एकदा आयपीएलचे वारे वाहायला लागले आहेत.
रांचीमध्‍ये पोहोचताच धोनीने सर्व सहका-यांना पार्टी दिली. ही पार्टी रात्री उशिरापर्यंत चालली. यामध्‍ये चेन्‍नई संघाच्‍या सर्व खेळाडूंचा समावेश होता.
ड्यू प्‍लेसिसच्‍या पत्‍नीचा वाढदिवस
या पार्टीमध्‍ये इमारी ड्यू प्‍लेसि‍सचा वाढदिवस साजरा करण्‍यात आला. इमारी ड्यु प्‍लेसिसची पत्नी आहे.

सुपरकिंग्जचा गुरुवारी सराव
गुरुवारी सायंकाळी पाच ते आठ या कालावधीत सुपरकिंग्जने जेएससीए स्टेडियमवर कसून सराव केला. आयपीएलच्या सातव्या मोसमात देशातील या संघाचा हा पहिलाच सराव असल्यामुळे त्याला विशेष महत्त्व देण्यात आले. कोलकाता नाइट रायडर्सच्या संघाचे गुरुवारी सायंकाळी सहा वाजता रेडिसना ब्ल्यू हॉटेलमध्ये आगमन झाले.
पुढील स्‍लाइडवर पाहा, पार्टीदरम्‍यानची छायाचित्रे...