आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

WC 2015 : जडेजा Out झाल्यास युवराज In होणार ? उद्या संघनिवड, संभाव्य संघ असा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रवींद्र जडेजाच्या दुखापतीच्या बातम्यांबाबतच्या गुंतागुतीमुळे तो विश्वचषकाच्या संघात निवडला जाणार का? याबाबत अद्याप काहीही निश्चित झालेले नाही. त्यामुळे जडेजाच्या जागी युवराज सिंगची संघात निवड होण्याची शक्यता आहे. पण निवड समिती अशा प्रकारचा निर्णय घेणार का? आगामी विश्वचषकात इशांत शर्माबरोबर कोणत्या वेगवान गोलंदाजांचा संघात समावेश असेल? अशा एक ना अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला उद्या मिळणार आहे. 11 व्या क्रिकेट विश्वचषकासाठी भारतीय संघाची उद्या निवड होणार आहे. त्या पाश्वभूमीवर या संघात अंतिम 16 मध्ये स्थान मिळवण्यासाठी कोण कोण दावेदार आहेत, त्यावर एक नजर या माध्यमातून टाकूयात...
महेंद्रसिंग धोनी
याच्याच खांद्यावर असेल संघाची जबाबदारी
कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम धोनीच्या नावावर आहे. 2011 मध्ये विश्वचषक जिंकलेल्या संघाचा होता कर्णधार.
बलस्थाने
धोनीच्या नेतृत्त्वात झालेल्या 166 पैकी 93 मध्ये भारताने विजय मिळवला आहे.
अखेरच्या षटकांमधील दबाव झेलण्यामध्ये धोनीचा हातखंडा आहे.
यॉर्कर आणि शॉर्टपिच चेंडू अत्यंत उत्कृष्टपणे खेळू शकतो.
त्रुटी
गेल्या काही महिन्यात फलंदाज म्हणून कामगिरीचा दबाव वाढत आहेत.
यष्टीरक्षणामध्ये कामगिरी काही प्रमाणात खालावल्याचे आरोपही त्याच्यावर झाले आहेत.
पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, इतर संभाव्य सदस्य आणि त्यांच्याबाबतची माहिती...