आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी असे आहेत 8 देशांचे हे संघ, हे आहेत Key Player

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क-1 जून ते 18 जून दरम्यान इंग्लंडमध्ये खेळल्या जाणा-या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी 8 देशांनी आपापले संघ जाहीर केले आहेत. यात भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, दक्षिण अफ्रिका, श्रीलंका आणि बांग्लादेश आदी संघाचा समावेश आहे. यंदा वेस्ट इंडीजच्या जागेवर बांग्लादेशला चॅम्पियंस ट्रॉफी खेळण्याची संधी मिळाली आहे. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, भारतासह या सर्व देशांचे कोणकोणते खेळाडू महत्त्वाचे आहेत. तसेच संपूर्ण संघासह कर्णधार कोण आहेत याचीही माहिती देणार आहोत. 4 जूनला भारत- पाकिस्तान मॅच...
 
- भारताला या स्पर्धेत आपली पहिली मॅच 4 जून रोजी सर्वात कट्टर शत्रू पाकिस्तानसोबत खेळायची आहे. विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघात शिखर धवन, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, एमएस धोनी, दिनेश कार्तिक यासारखे फलंदाज, युवराज सिंग, केदार जाधव, हार्दिक पांड्या, आर आश्विन आणि रवींद्र जडेजा यासारखे ऑलराउंडर्स आहेत. तर, मो. शमी, उमेश यादव, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह यासारखे वेगवान गोलंदाज आहेत.
 
कोणत्या ग्रुपमध्ये कोणते आहेत देश- 
 
ग्रुप ए : ऑस्ट्रेलिया, बांग्लादेश, इंग्लंड आणि न्यूझीलंड.
ग्रुप बी : भारत, पाकिस्तान, साउथ अफ्रीका आणि श्रीलंका.
 
भारताच्या मॅच या दिवशी-

4 जून : भारत vs पाकिस्तान
8 जून: भारत vs श्रीलंका
11 जून : भारत vs साउथ अफ्रीका.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, उर्वरित 7 देशाच्या की प्लेयरसह संघाबाबत...
बातम्या आणखी आहेत...