Home | Sports | Other Sports | tean-india-going-to-wi

टीम इंडिया विंडीजला रवाना

Agency | Update - Jun 02, 2011, 05:54 AM IST

सचिन तेंडुलकर आणि महेंद्रसिंग धोनीसारख्या दिग्गजांच्या अनुपस्थितीत टीम इंडिया आज वेस्ट इंडीज दौर्‍यावर रवाना झाली.

  • tean-india-going-to-wi

    मुंबई - सचिन तेंडुलकर आणि महेंद्रसिंग धोनीसारख्या दिग्गजांच्या अनुपस्थितीत टीम इंडिया आज वेस्ट इंडीज दौर्‍यावर रवाना झाली. या दौर्‍यावर टीम इंडिया 1 टी-20, पाच एकदिवसीय आणि 3 कसोटी सामने खेळणार आहे.

    सुरेश रैनाच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल एअरपोर्टहून रात्री अडीच वाजता लंडन माग्रे बार्बाडोसला रवाना झाला. भारतीय संघाला त्रिनिदाद येथे 4 जून रोजी एकमेव टी-20 सामना खेळायचा आहे. यानंतर 6 व 8 जून रोजी त्रिनिदाद व 11 आणि 13 जून रोजी अँटिग्वा येथे वनडे सामने होतील. वनडे मालिकेनंतर तीन कसोटी सामन्यांची मालिका होईल.

    नंतर धोनी, जहीर, व्ही.व्ही.एस. लक्ष्मण, राहुल द्रविड आणि र्शीसंत कसोटीसाठी संघात सामील होतील. भारताने यापूर्वी 2006 मध्ये राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडीजचा दौरा केला होता. त्या वेळी भारताने 35 वर्षांत प्रथमच यजमान संघाला चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत पराभूत करण्याचा पराक्रम केला होता. मात्र नंतर झालेल्या पाच वनडे मालिकेत भारत पराभूत झाला होता.Trending